Parbhani Lok Sabha: मतदारांनो तुमची साथ वणव्यामध्ये गारव्यासारखी, संजय जाधव झाले भावूक

Sanjay Jadhav: निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांचा चांगलाच घाम निघाला. पदयात्रा, प्रचार सभा, बैठका, नेत्यांचे दौरे या सगळ्या धामधुमीत उमेदवारांचा कस पणाला लागला होता. या काळात भक्कमपणे साथ देणारे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानताना शिवसेनेचे संजय जाधव भावूक झाले.
Sanjay Jadhav
Sanjay JadhavSarkarnama

Parbhani Lok Sabha Election 2024: महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघाचा (Parbhani Lok Sabha Constituency) कौल मतपेटीत बंद झाला आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका हा निवडणूक प्रचाराचा एक भाग असला तरी आता ते सगळं विसरून उत्सुकता आहे ती निकालाची. स्थानिक विरुद्ध बाहेरचा, मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha Vs OBC) अशा वणळणावर निवडणुकीचा प्रचार गेला होता.

महायुतीचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना बाहेरचा उमेदवार म्हणून हिणवले गेले, परंतु त्यांनी आपली ताकद दाखवत महाविकास आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यात आणि जानकरांमध्ये अटीतटीची लढत झाल्यामुळे ठामपणे कोणीही हाच विजयी होईल, असा दावा करताना कचरत आहे. यावरून निवडणूक किती चुरशीची झाली याचा अंदाज येतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांचा चांगलाच घाम निघाला. पदयात्रा, प्रचार सभा, बैठका, नेत्यांचे दौरे या सगळ्या धामधुमीत उमेदवारांचा कस पणाला लागला होता. या काळात भक्कमपणे साथ देणारे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानताना शिवसेनेचे संजय जाधव भावूक झाले. या शिवाय मतदारांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मतदारांनो तुमची साथ वणव्यामध्ये गारव्यासारखी होती, अशा शब्दात जाधव यांनी मतदारांचे आणि निवडणूक काळात मदत करण्याऱ्या प्रत्येकाचे आभार मानले, आभार त्या प्रत्येक नागरिकाचे ज्यांनी लोकशाहीला बळकटी देण्यासाठी मतदान केले. रणरणत्या उन्हात तुम्ही प्रचारादरम्यान मला दिलेली भक्कम साथ माझा आत्मविश्वास वाढवणारी होती. ती साथ 'वणव्यामध्ये गारव्या' सारखी होती. कुठल्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करू, तेच सुचत नाही, एवढा तुमच्या प्रेमाने भारावून गेलो आहे. प्रचंड प्रमाणात घराबाहेर पडून तुम्ही सर्वांनी ही निवडणूक हाती घेतली. प्रत्येक क्षणी तो तुमच्या समर्थनाचा, पाठिंब्याचा हात माझा उत्साह आणि ऊर्जा वाढवत होता. हा तुमचा उत्साह आणि बाणेदारपणा कायम लक्षात राहील, असं जाधव म्हणाले.

Sanjay Jadhav
Baramati Lok Sabha: संधीच सोनं करायचं की राख? तुम्हीच ठरवा; अजित पवारांचं मतदारांना आवाहन

तसेच, सध्याच्या या तोडफोडीच्या व गद्दारीच्या राजकारणात स्वाभिमान आणि निष्ठेला महत्त्व आहे, हे उदाहरण आपण महाराष्ट्रासमोर ठेवणार आहोत, ते केवळ तुमच्याच या भक्कम पाठिंब्याने, पून: महाविकास आघाडीचे (MVA) सर्व नेते, पदाधिकारी व माय बाप जनतेबद्दल कृतज्ञता आणि आभाराच्या भावना व्यक्त करतो, असे म्हणत संजय जाधव यांनी विजयाचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com