Jarange Patil VS BJP : जरांगेंना छेद देण्यासाठी भाजपची खेळी? एकाच महिलेच्या नावात 'गोलमाल' करून दोन शहरांत आंदोलन

पंधरवाड्यातच नाव बलण्यामागे इंगीत आणि बीडचे आंदोलन सोडविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या नेत्यांची धावाधाव यामुळे संभाजीनगरच्या आंदोलनाचा हेतू आणि बळ कोणाचे असा मुद्दा उपस्थित होत आहे.
Rajshree Rathod
Rajshree Rathodsarkarnama
Published on
Updated on

20 दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कोरडेवाडी (ता. केज) येथे राजश्री राठोड यांनी तलावाच्या प्रश्नावर उपोषण आणि आंदोलन केले. त्यांचे आंदोलन सोडविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनीच धडपड केली होती. बीड जिल्ह्यातील आंदोलना वेळी राजश्री राठोड असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करताना राजश्री उंबरे पाटील का, असा प्रश्न पडत आहे. पंधरवाड्यातच नाव बलण्यामागे इंगीत आणि बीडचे आंदोलन सोडविण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या नेत्यांची धावाधाव यामुळे संभाजीनगरच्या आंदोलनाचा हेतू आणि बळ कोणाचे असा मुद्दा उपस्थित होत आहे.

मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे वर्षभरापूर्वी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु झाले. पोलिसांच्या लाठीहल्ल्याने आंदोलन संपविण्याचा प्लॅन धुळीस मिळाला. उलट आंदोलनाचा धार अधिक तीव्र झाला. अंतरवालीतील इशारा सभा रेकॉर्डब्रेक तर झालीच शिवाय वर्षभरातील अंतिम इशारा सभा, शांतता मोर्चांनाही मोठा प्रतिसाद मिळाला. परंतु, सरकार आणि विशेषत: भाजपने आंदोलनात फुट पाडण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढविल्या. काहींनी पत्रकार परिषदा घेत त्यांच्यावर टिका केली तर भाजप आमदारांनीही आंदोलनाबद्दल अक्षेप घेतले.

Rajshree Rathod
Parli Assembly Constituency : भाजप कार्यकर्त्यांची खदखद; मुंडे भावंडे कसा मार्ग काढणार

याचे सत्र अलिकडे राणे, लाड, दरेकरांवरुन आमदार राजेंद्र राऊतांवर येऊन ठेपले. परंतु, आता छत्रपती संभाजीनगरला मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेल्या व अतुल सावे आणि दिपक केसरकर यांनी भेट दिलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्षा राजश्री उंबरे पाटील यांचे गेल्याच महिन्यात कोरडेवाडी येथील तलाव प्रश्‍नावरील आंदोलनात धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्षा राजश्री राठोड असे नाव कसे होते असा प्रश्न‍न आहे. केज तालुक्यातील कोरडेवाडीचा तलावाचा प्रश्‍न अनेक वर्षांपासूनचा आहे.

या आंदोलनात त्यांनी एन्ट्री घेतली आणि उपोषण केले. ग्रामस्थाांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न‍न असल्याने यावर रास्ता रोकोही झाला. पण, ग्रामीण भागातील आंदोलन असल्याने त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र, तरीही ता. 25 ऑगस्टच्या रात्री त्यांच्या मदतीला भाजपचे राजेंद्र साबळे पाटील धावून आले. म्हणे त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याशी त्यांचे बोलणे करुन दिले आणि फडणवीसांनी त्यांना आश्‍वासनानंतर त्यांनी माघार घेतली.

Rajshree Rathod
Vijay Wadettiwar : 'महायुतीचा एकच मंत्र, काम कमी हेच तंत्र'; विजय वडेट्टीवारांची फटकेबाजी

आता त्याच राजश्री राठोड यांनी राजश्री उंबरे पाटील नावाने संभाजीनगर येथील क्रांती चौकात उपोषण केले. त्या ठिकाणीही राजेंद्र साबळे पाटील आघाडीवर होतेच. उपोषणालाही सुरुवातीला भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी भेट दिली. तर, पुन्हा दिपक केसरकर यांच्या

आश्‍वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला छेद देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप कुंदा काळे यांनी केला. सदर युवती भाजपची पदाधिकारी असल्याचा दावा करत कुंदा काळे यांनी राजश्री राठोड, राजश्री नाईक, राजश्री उंबरे पाटील असे अनेक नावाने त्यांच्याच सोशल मीडियावर असलेले बॅनर दाखवून त्या भाजपच्या माहूर तालुका पदाधिकारी असल्याचा दावा केला. कोरडेवाडी आंदोलनाच्या माध्यमातून फडणवीसांचे बोलणे करण्याच्या निमित्ताने अगोदर प्रसिध्दीच्या झोतात आणायचे व नंतर त्या ग्लॅमरच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला छेद देण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे कुंदा काळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com