Marathwada BJP News : भाजपचे नो रिस्क, मराठवाड्यात तीनही विद्यमान खासदारांना उमेदवारी, बीडमध्ये भाकरी फिरवली..

Loksabha Election 2024 : भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
BJP MP
BJP MPSarkarnama
Published on
Updated on

BJP Lok Sabha Candidates Second List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. मात्र दुसऱ्या यादीत भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करत सस्पेन्स दूर केला. मराठवाड्याचा विचार केला तर भाजपने कोणतीही रिस्क न स्वीकारण्याचे धोरण ठरवल्याचे दिसून आले आहे.

जालना, लातूर, नांदेड या तीनही मतदारंसघात भाजपने विद्यमान खासदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर बीडमध्ये प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून ती त्यांच्या भगिनी व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांना देण्यात आली. यातून भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोपही खोडून टाकण्याचा प्रयत्न केला. शिवाय बीड जिल्ह्यात असलेला भाजपचा पारंपारिक मतदार दुरावणार नाही याची काळजीही वाहिल्याचे दिसून आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP MP
Murlidhar Mohol News: भाजपाचं पुण्यात धक्कातंत्र! मुळीक, देवधरांचा पत्ता कट, मोहोळांच्या गळ्यात उमेदवारीची माळ

पंकजा मुंडे यांचे हे राजकीय पुनर्वसन असले तरी प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी पंकजा यांना सूचक इशाराही दिला आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील भाजपकडे असलेल्या जालना, लातूर आणि नांदेड लोकसभा मतदारसंघापैकी जालना, नांदेडची उमेदवारी अपेक्षित होती. परंतु लातूरमध्ये पुन्हा सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी मिळाल्याने अनेकांना धक्का बसला.

पंकजा मुंडे यांचे हे राजकीय पुनर्वसन असले तरी प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी पंकजा यांना सूचक इशाराही दिला आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील भाजपकडे असलेल्या जालना, लातूर आणि नांदेड लोकसभा मतदारसंघापैकी जालना, नांदेडची उमेदवारी अपेक्षित होती. परंतु लातूरमध्ये पुन्हा सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी मिळाल्याने अनेकांना धक्का बसला.

BJP MP
BJP Lok Sabha Candidate List : भाजपने महाराष्ट्रातील 'या' 4 विद्यमान खासदारांचा पत्ता केला कट; पाहा यादी!

पाच वर्षात लातूर मतदारसंघात फारसे न दिसलेले, जनतेच्या संपर्कात नसलेले श्रृंगारे यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी पदरात पाडून घेत आपले दिल्लीतील वजन दाखवून दिले आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे() हे सलग पाचवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे सहाव्यांदा पक्षाकडून त्यांनाच उमेदवारी दिली जाईल हे निश्चित होते. गेल्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांना गती देऊन ती पुर्ण करून घेतली होती, ते पाहता त्यांची सहाव्यांदा उमेदवारी फिक्स समजली जात होती.

शिवाय जालन्यातून उमेदवारीसाठी दानवे यांना कुणीच स्पर्धक नसल्याने तसाही त्याचा मार्ग मोकळा होता. जालना ते मुंबईत वंदे भारत ट्रेन, जालना येथील रेल्वे पीटलाईन, ड्रायपोर्टचे उद्घाटन करून घेत रावसाहेब दानवे यांनी धडाकेबाज प्रचाराला सुरवातही केली होती. तिकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यात लोकसभेची उमेदवारी देतांना काही बदल होतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

BJP MP
Loksabha Election 2024 News : महाराष्ट्रात भाजपकडून पंकजा मुंडेंसह 'या' पाच महिलांना लोकसभेची उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची मीनल पाटील खतगावकर यांनी भेट घेतली होती. त्यामुळे चिखलीकरांची उमेदवारी कापली जाते की काय? अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली तेव्हापासून नांदेडची जागा डेंजर झोनमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

चिखलीकरांना पक्षांतर्गत विरोध आहे, भाजपचे आमदारच त्यांच्यावर नाराज आहेत, हे दर्शवणाऱ्या काही घटना मध्यंतरीच्या काळात नांदेडमध्ये घडल्या होत्या. परंतु अशोक चव्हाण यांना 2019 मध्ये पराभूत करून विजयी झालेल्या चिखलीकरांनाच पुन्हा संधी देत भाजपने नांदेडमध्ये शतप्रतिशत भाजपच हा संदेशही यातून दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com