BJP News : नाराजीचा मेसेज जाताच 'बावनकुळे' संभाजीनगरमध्ये; 'राजुरकरांशी' चाय पे चर्चा; नव्या जबाबदारीकडे लक्ष

भाजपच्या शहराध्यक्ष पदावर संधी न मिळाल्याने समीर राजूरकर नाराज झाले होते. प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये समीर राजूरकर यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
BJP State President Chandrashekhar Bawankule visits Samir Rajurkar’s residence
BJP State President Chandrashekhar Bawankule visits Samir Rajurkar’s residenceSarkarnama
Published on
Updated on

गत आठवड्यात भाजपने छत्रपती संभाजीनगरच्या शहराध्यक्षपदी किशोर शितोळे यांची नियुक्ती केली. यानंतर शहराध्यक्षपदावरून दुसऱ्यांदा डावलल्याने समीर राजूरकर कमालीचे नाराज आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरात कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपची विभागीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेतील राजूरकर यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान, त्यांच्या नाराजीचा मेसेज मिळताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राजूरकर यांचे घर गाठले आणि त्यांच्याशी चर्चा करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

मे महिन्यात भाजपने राज्यातील सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची निवड केली. यात छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष शिरीश बोराळकर यांच्या जागी नवीन चेहरा द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार भागवत कराड यांनी केली होती. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी बोराळकर यांच्यासोबतच समीर राजूरकर, जालिंदर शेंडगे, दिलीप थोरात या चार नावांची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. गतवेळी अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडता पडता थोडक्यात हुकल्याने यावेळी आपल्याला संधी नक्की मिळेल अशी आशा राजूरकर यांना होती. पदाधिकाऱ्यांकडून 'बंद पाकिटात ' घेतलेल्या अभिप्रायामध्येही त्यांच्या नावालाही अनेकांनी पसंती दर्शवली होती.

पण अध्यक्ष पदावरून पडलेल्या गटा-तटात अचानक राजूरकर यांचे नाव मागे पडले. अखेरच्या क्षणी पदवीधर निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून संधी न मिळालेल्या, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांचे समर्थक असलेल्या किशोर शितोळे यांची निवड करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पसंती दर्शविल्यानंतरही अध्यक्ष पदासाठी डावलण्यात आल्याने राजूरकर नाराज कमालीचे नाराज झाले होते. त्यात विभागीय कार्यशाळेतही ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा मेसेज वरिष्ठ नेत्यांना पोहोचविण्यात आला. हा मेसेज मिळताच अहिल्यानगर दौऱ्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छत्रपती संभाजीनगर मार्गे गेले.

BJP State President Chandrashekhar Bawankule visits Samir Rajurkar’s residence
Nitesh Rane Politics: बडगुजर, सय्यद यांच्यावर गंभीर आरोप करून सभागृह हादरवून टाकणारे नितेश राणे आता काय करणार?

या दौऱ्यात बावनकुळेंनी राजूरकर यांच्या निवासस्थानी जात 'चाय पे चर्चा' करीत त्यांची नाराजी दूर केली. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांचीही उपस्थिती होती. बावनकुळे यांच्यासोबत वाहनात मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्तीय असणारे अनिल मकरिये हेही असल्याचे दिसले. राजूरकर यांच्या निवासस्थानीही ते उपस्थित होते. पण आता राजूरकर यांना आता पक्षाकडून कुठली जबाबदारी, पद दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com