Shivsena-BJP News : मोदींविरोधातील आंदोलनाचा राग भाजपने काढलाच..

BJP took revenge for the agitation against Modi : शिवसंकल्प मेळावा आणि महाराष्ट्र स्वाभिमान सभेच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काल रात्री झालेल्या संभाजीनगरातील स्वाभिमान सभेत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार तोफ डागली होती.
BJP Protest Against Aditya Thackeray
BJP Protest Against Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena-BJP Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्या वेळी छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाबाहेर शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने काळे कपडे परिधान करून आंदोलन केले होते. बदलापूरसह देशातील महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ हे आंदोलन होते.

अंबादास दानवे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करत राज्याचे लक्ष वेधून घेतले खरे, पण त्याचे पडसाद चोवीस तासातच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भाजपकडून विरोध करत उमटले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कालपासून संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.

शिवसंकल्प मेळावा आणि महाराष्ट्र स्वाभिमान सभेच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काल रात्री झालेल्या संभाजीनगरातील स्वाभिमान सभेत आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार तोफ डागली होती. महायुतीचे सरकार आणि भाजप 15 लाखाहून पंधराशे रुपयांवर आल्याची खोचक टीका करत आदित्य ठाकरे यांनी `लाडकी बहीण` योजना निवडणुकीच्या तोंडावर आणल्याचा आरोप केला होता.

BJP Protest Against Aditya Thackeray
Shivsena UBT News : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सिल्लोडचा दौरा का टाळत आहेत ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव दौऱ्यापूर्वी महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनामुळे स्थानिक भाजप दाधिकाऱ्यांच्या मनामध्ये खदखद आणि संताप होता. तो व्यक्त करण्याची संधी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे त्यांना मिळाली. (Shivsena) संत एकनाथ रंगमंदिर मधील मेळाव्यातून भाजपवर कडाडून हल्ला चढवलेले आदित्य ठाकरे शहरात मुक्कामी होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ते मुक्कामी असलेल्या हॉटेल समोर जाऊनच आंदोलन करण्याचे ठरवले होते.

त्यानुसार आज भाजपचे जालिंदर शेंडगे, नितीन चित्ते, हर्षवर्धन कराड, लक्ष्मीकांत थेटे, रामेश्वर भादवे, शालिनी बुंदे, मीना मिसाळ यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सकाळी नऊच्या सुमारास हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर जमले. यावेळी या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे हाय हाय आणि दिशा सालियन प्रकरणाचे काय झाले? अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. बाहेर हा गोंधळ सुरू असताना हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेना नेते अंबादास दानवे आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवेशद्वारावर आले.

BJP Protest Against Aditya Thackeray
Aditya Thackeray : केंद्रातील भाजप सरकारच्या 'फायनान्स मॉडेल'वर आदित्य ठाकरेंचे फटकारे

भाजपचे आंदोलन पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यातून दोन्ही गट एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि परिस्थिती चिघळली. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी भाजपच्या आंदोलकांना बाजूला नेत शिवसैनिकांवर सौम्य लाठीमार केला. या गोंधळामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा चर्चेत तर आला पण शिवसेना-भाजप मधील या राड्यामुळे शहरातील वातावरणही चांगलेच तापले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजप- महायुतीला जोरदार दणका दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच विजयाची पुनरावृत्ती करत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत. यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच नेत्यांनी भाजप विरोधात राज्य आणि देश पातळीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. याचा परिणाम प्रत्येक जिल्ह्यात आणि विधानसभेच्या मतदारसंघात दिसू लागला आहे.

BJP Protest Against Aditya Thackeray
BJP Operation Lotus: काँग्रेस आमदाराला फोन, भाजपाला हवे आहेत 50 आमदार विकत; पुन्हा 'ऑपरेशन लोटस', सरकार पाडण्यासाठी 100 कोटींची ऑफर

अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदींच्या विरोधात काल झालेल्या महाविकास आघाडीच्या आंदोलनामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्याचा परिणाम आज आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेल बाहेरील घोषणाबाजी आणि राड्यात झाला. शिवसेना-भाजप या दोन पक्षातील ही खदखद विधानसभा निवडणुकीच्या काळात अधिक आक्रमकपणे बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com