Loksabha Election : 'भाजपने हेमंत पाटील, भावना गवळी यांचा बळी घेतला', शिंदे गटातील नेत्याचे गंभीर आरोप

Suresh Navle : शिवसैनिकांनी उठाव केला. ठाकरेंची साथ सोडत ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. खासदार शिंदेंसोबत गेले. मात्र, विद्यमान खासदारांना आपली खासदारकी टिकवता आली नाही.
Hemant patil, Eknath shinde, bhavna gavli
Hemant patil, Eknath shinde, bhavna gavlisarkarnama

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत सर्व्हेच्या नावाखाली शिंदे गटाचे भाजप खच्चीकरण करत असल्याचा आरोप शिंदे गटातील कार्यकर्ते करत आहेत. तीन विद्यमान खासदारांना तिकीट नाकारण्यात आले. शिंदे गटातून तिकीट कोणाला द्यायचे हे भाजपच ठरवत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने BJP चक्रव्युहात अडकवून त्यांचा अभिमन्यू केल्याचा दावा शिंदे गटातील माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे.

Hemant patil, Eknath shinde, bhavna gavli
Devendra Fadnavis On Sharad Pawar : 'बारामतीकरांच्या मनातील सूनबाई दिल्लीला नक्की जाणार'; फडणवीस यांचा शरद पवारांना टोला !

शिवसैनिकांनी उठाव केला. ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडत ते एकनाथ शिंदेंसोबत गेले. खासदार शिंदेसोबत गेले. मात्र, विद्यमान खासदारांना आपली खासदारकी टिकवता आली नाही. भाजपाच्या दबावाने कृपाल तुमाने ,हेमंत पाटील ,भावना गवळी (Bhavna gawli) यांचा बळी दिला गेला, असा दावा नवले यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसैनिकांचे खच्चीकरण केले जात आहे. हे चित्र आशादायी नाही. मित्रपक्षाचे उमेदवार पोसण्याचे काम शिवसेनेला करावे लागत आहे. परभणीची जागा शिवसेनेची होती. ती जागा मित्रपक्षाला सोडण्यात आली. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा भाजपने घेतली. नाशिकची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याची माहिती आहे. ती जागा शिवसेनेचीच होती. सातारची जागा शिवसेनेची होती. या जागेवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लढण्यास इच्छुक होते. मात्र, ही जागा भाजपला देण्यात आली, असे सुरेश नवले म्हणाले.

नवले म्हणाले, भाजपने सांगितले की आयबीचे रिपोर्ट, सर्व्हे तुमच्या विरोधात आहेत. मुख्यमंत्र्यांवर भाजपचा प्रचंड दबाव आहे. पण मला मुख्यमंत्र्यांचा अपुरेपणा दिसून येताे आहे. ते लढत आहेत. मात्र त्यांच्यावर सामूहिक दबाव आणला जात आहे. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेच्या जागा मित्रपक्षांना देण्यात आला

आत्ताच ही स्थिती आहे तर विधानसभेला काय होणार. तुमच्या आमदारांच्या विरोधात निगेटिव्ह सर्व्हे आहे. आयबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, असे भाजप सांगेल. संजय शिरसाट यांच्या विरोधात सर्व्हे आहे. अब्दुल सत्तार यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. त्यांना तिकीट दिलं जाणार नाही, असे भाजप सांगेल. 48 जागांवर ही स्थिती आहे तर भाजप 288 जागेवर काय करेल, अशी भीती नवले यांनी व्यक्त केली.

R

Hemant patil, Eknath shinde, bhavna gavli
Nanded VBA News : वंचितच्या भोसीकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले वसंत चव्हाण डमी..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com