Balwant Wankhede On BJP : भाजप एकनाथ शिंदे - अजितदादांपैकी एकाचा पत्ता कट करणार; 'या' आमदाराच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे.
Eknath Shinde and Ajit Pawar
Eknath Shinde and Ajit PawarSarkarnama

Amravati News: शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुरू आहे. या सुनावणीवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी भाजपवर मोठा आरोप केला आहे.

"भाजप फक्त सत्तेसाठी हपापली असून, उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करून भाजपने एकनाथ शिंदे यांना बरोबर घेत सत्ता बळकावली. आमदारांच्या अपात्रतेबाबत काय होऊ शकते, हे भाजपला चांगल ठाऊक आहे. त्यामुळे आणखी एक राजकीय खेळी खेळत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली", असा गंभीर आरोप आमदार वानखडे यांनी केला.

तसेच आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणाच्या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यापैकी कुणाचाही भाजप पत्ता कट करू शकते, असा दावाही आमदार वानखडे यांनी केला.

Eknath Shinde and Ajit Pawar
Aaditya Thackeray Nagpur Tour : नागपुरात येऊनही आदित्य ठाकरेंची ओबीसी आंदोलनाकडे पाठ; चर्चांना उधाण

सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर नार्वेकर तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावरून आता प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, ते दिल्लीला का गेले ? असा सवाल आमदार वानखडे यांनी उपस्थित केला आहे.

"भाजपकडे जर आमदारांचे संख्याबळ होते तर अजितदादांना सोबत घेण्याची गरज काय होती, अजित पवारांना बरोबर घेणे ही भाजपची मोठी राजकीय खेळी असून, वापर करायचा काम संपले की फेकून द्यायचं, ही भाजपची नीती असल्याचा घाणाघातही त्यांनी केला.

देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपने अशीच खेळी खेळली. प्रादेशिक पक्षांना हाताशी धरायचे. त्यांच्याकडून काम काढून घ्यायचे व नंतर त्यांना संपवायचे असे प्रकार भाजप करत आहे. मात्र, आगामी काळात भाजपला या साऱ्याची शिक्षा मिळेल", असेही वानखडे म्हणाले.

"देशात सध्या काँग्रेस नेते राहुल गांधींची लोप्रियता वाढत आहे. 'इंडिया' आघाडीमुळे भाजपला धडकी भरली असून, सामान्यांच्या मुद्द्यापासून भाजप मतदारांना भरकटवित आहे. पण आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदार भाजपला जागा दाखवून देतील. देश व राज्याच्या हिताचे अनेक निर्णय काँग्रेसने घेतले आहेत. त्यामुळे आगामी काळात मतदार काँग्रेसला नक्कीच कौल देतील", असा विश्वासही आमदार वानखडे यांनी व्यक्त केला.

Edited by - Ganesh Thombare

Eknath Shinde and Ajit Pawar
OBC Reservation : ओबीसी आंदोलनाची धग पेटली; आंदोलनकर्त्यांनी रोखला चंद्रपूर-नागपूर महामार्ग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com