BJP Politics : भाजपचं ठरलं! विधानसभा निवडणूक 'या' नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वात लढवणार?

BJP Politics News : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार का?
Amit Shah, Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis
Amit Shah, Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 24 Sep : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.

या चर्चा सुरू होण्याला कारणीभूत ठरलं आहे एक पत्रक, जे नागपुरातील केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना वाटण्यात आलं आहे.

या पत्रकामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आपल्यासाठी एक नवीन परीक्षा असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायला हवं, असा संदेश देण्यात आला आहे. तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वव्यापी नेतृत्व आपल्याकडे आहेच, तसेच अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा आहे, असा उल्लेख या पत्रकात करण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका भाजप (BJP) नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वात लढवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पत्रकात भाजपच्या कार्यकर्त्यांना आता आपलं एकच लक्ष्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असं सांगण्यात आलं आहे.

Amit Shah, Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis
Shiv Sena Kolhapur : कोल्हापूर 'उत्तर'वरून ठाकरे गट इरेला पेटला, काँग्रेस आघाडी धर्म पाळणार?

पत्रकात नेमकं काय लिहिलं आहे?

जोवर आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही, तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही आणि विश्रांतीही घेणार नाही. आता सर्वांचं एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly elections). महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्यूहात अडकवू पाहत आहेत. मात्र आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे असा कानमंत्रही कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.

Amit Shah, Nitin Gadkari, Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis
Akshay Shinde Encounter : खासदार गायकवाडांनी थेट विचारलं; 'बदलापूरच्या शाळेचे विश्वस्त आपटे फरार का?'

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष

शिवाय भाजप काहीच साधनं नसतानाही एवढा मोठा पक्ष झाल्याचा उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. 'जेव्हा साधनं कमी होती आणि अडचणी जास्त होत्या, आपल्यापेक्षा परके जास्त होते. तेव्हा आपण पक्षाचं काम जोमाने केलं आणि त्या परिस्थितितून भाजप उभा राहिला. कधीकाळी ज्या पक्षाचं काहीच अस्तित्व नव्हतं, तो आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आणि संघटना आहे. हे कोणी केलं तर ते भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलं, प्रत्येक पिढीतील कार्यकर्त्याने हे केलं, असंही पत्रकात नमूद केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com