High Court News : महाराष्ट्र सरकारची कृती 'मनमानी आणि बेकायदेशीर' म्हणत कंपनी कोर्टात : महत्त्वकांक्षी योजनेतील कामांना हायकोर्टाची स्थगिती

Vasantrao Naik Tanda Scheme : वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतील मंजूर कामे रद्द करण्याच्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने नवीन कामांना अंतरिम स्थगिती दिली आहे.
Bombay High Court Aurangabad Bench hears plea challenging Maharashtra government’s decision to cancel previously sanctioned works under Vasantrao Naik Tanda Vasti Sudhar Yojana.
Bombay High Court Aurangabad Bench hears plea challenging Maharashtra government’s decision to cancel previously sanctioned works under Vasantrao Naik Tanda Vasti Sudhar Yojana.Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : 'वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने' अंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द करून नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयाने सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील 25 ऑगस्ट 2025 च्या प्रशासकीय आदेशाद्वारे मंजूर झालेल्या सर्व कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप दिले नसल्यास पुढील सुनावणीपर्यंत देवू नयेत, असे अंतरिम आदेश न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन एस. वेणेगावकर यांनी दिले आहेत.

'अलका कन्स्ट्रक्शन्स' या भागीदारी संस्थेला 31 मार्च 2025 च्या निर्णयानुसार लोहा (जि. नांदेड) तालुक्यातील सायल आणि सोनमंजरी येथील काही कामांचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, 24 एप्रिल 2025 रोजी एका पत्राद्वारे ही कामे प्रशासकीय कारणास्तव अचानक स्थगित केली. त्यानंतर 25 ऑगस्ट 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार जुन्या कामांच्या वर्क ऑर्डर्स रद्द करून जिल्हा नियोजन समितीने सुचवलेल्या राज्यातील नवीन 342 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

यानंतर नांदेड जिल्हा परिषदेकडून या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली व संबधित ग्रामपंचायतने कार्यारंभ आदेश अलका कन्स्ट्रक्शन्सला दिले. परंतु अचानक ही सर्व प्रक्रिया 24 एप्रिल 2025 च्या शासन आदेशानुसार स्थगित करण्यात आली व त्यानंतर याच बजेटमध्ये 25 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार नवीन कामे मंजूर करून पूर्वीची सर्व कामे रद्द करण्यात आली.

Bombay High Court Aurangabad Bench hears plea challenging Maharashtra government’s decision to cancel previously sanctioned works under Vasantrao Naik Tanda Vasti Sudhar Yojana.
Sandipan Bhumre Press : 'एकाही आरोपात तथ्य नाही!' संदीपान भुमरेंनी थोपटले दंड; अंबादास दानवे यांना कोर्टात खेचणार, नेमका काय आहे 'हिबानामा' वाद?

या शासन निर्णयास अलका कन्स्ट्रक्शन्सने ॲड. संभाजी टोपे यांच्यामार्फत ही कृती 'मनमानी आणि बेकायदेशीर' असल्याचे म्हणत न्यायालयात दाद मागितली. सुनावणीत न्यायालयाने नमूद केले की, 6 जानेवारी 2026 रोजी सरकारला नोटीस देऊनही अद्याप सरकारकडून स्पष्ट सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ज्या कामांना 25 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे, त्यांच्या वर्क ऑर्डर्स अद्याप निघाले नसल्यास त्या पुढील तारखेपर्यंत काढण्यात येऊ नयेत.

Bombay High Court Aurangabad Bench hears plea challenging Maharashtra government’s decision to cancel previously sanctioned works under Vasantrao Naik Tanda Vasti Sudhar Yojana.
Nanded News : मोठी बातमी: नांदेडचा ढाण्या वाघ आता शिवसेनेसोबत! शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

तसेच प्रतिवादींना याप्रकरणी 27 फेब्रुवारी पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. संभाजी टोपे हे काम पाहत आहेत तर सरकारतर्फे ॲड. आर. एस. वणी यांनी बाजू मांडली. प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मार्च 2026 रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com