Nanded News : मोठी बातमी: नांदेडचा ढाण्या वाघ आता शिवसेनेसोबत! शेकडो समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

Nanded political news latest update : नांदेडचे ढाण्या वाघ मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नांदेड राजकारणातील ताज्या घडामोडी वाचा.
Shankar Anna Dhondge joins Shiv Sena in Mumbai in the presence of Deputy CM Eknath Shinde.
Shankar Anna Dhondge joins Shiv Sena in Mumbai in the presence of Deputy CM Eknath Shinde.Sarkarnama
Published on
Updated on

Nanded political news today : नांदेडच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. कंधारचे माजी आमदार आणि शेतकरी चळवळीतील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शंकरअण्णा धोंडगे यांनी अखेर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी शेकडो समर्थकांसह ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शंकरअण्णा धोंडगे यांची राजकीय वाटचाल अनेक वळणांनी भरलेली राहिली आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) या पक्षात कार्यरत होते. कंधार मतदारसंघातून त्यांनी आमदार म्हणून काम केले. नंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भारत राष्ट्र समिती म्हणजेच BRS मध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना अपेक्षित राजकीय यश मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही सहकाऱ्यांना सोबत घेत महाराष्ट्र राज्य सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. तरीही जनाधार वाढवण्यात त्यांना यश मिळाले नाही.

Shankar Anna Dhondge joins Shiv Sena in Mumbai in the presence of Deputy CM Eknath Shinde.
New IAS Transfer Policy : मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे आता वशिलेबाजी चालणार नाही! IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय

या पार्श्वभूमीवर धोंडगे यांनी नव्या राजकीय पर्यायाचा शोध सुरू केला होता. अखेर त्यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात आमदार बालाजी कल्याणकर, बालाजी खतगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात शिंदे यांनी धोंडगे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करत शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी कार्यकर्त्यांची संघटना असल्याचे सांगितले. जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल, त्याला पक्षात योग्य संधी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

धोंडगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्ही राजकीय प्रवाह पाहिले; मात्र शेतकरी हितासाठी दिलदार नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेत आलो असून पुढेही शेतकऱ्यांसाठी काम करू.

Shankar Anna Dhondge joins Shiv Sena in Mumbai in the presence of Deputy CM Eknath Shinde.
Kolhapur News : कोल्हापूर मनपात मोठा उलटफेर! पराभूत उमेदवाराची लागली 'लॉटरी', स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित!, कोण आहेत ते नशीबवान 8 चेहरे?

या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, कंधार आणि आसपासच्या भागात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com