Sandipan Bhumre Press : 'एकाही आरोपात तथ्य नाही!' संदीपान भुमरेंनी थोपटले दंड; अंबादास दानवे यांना कोर्टात खेचणार, नेमका काय आहे 'हिबानामा' वाद?

sandipan bhumre latest news today : संदीपान भुमरे यांनी सर्व आरोप फेटाळत अंबादास दानवे यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे. नेमका हिबानामा वाद काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Sandipan Bhumare
Sandipan Bhumaresarkarnama
Published on
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषद घेत हिबानामा आधारे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांच्या कारचालकाचे नाव घेत समृद्धी महामार्ग लगतची 23 एकर जमीन हडपण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काल आमदार विलास भुमरे यांनी अंबादास दानवे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे म्हणत आरोप फेटाळले होते.

तर आज खासदार संदिपान भुमरे यांनीही अंबादास दानवे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळत त्यांच्या विरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे जाहीर केले. कालपासून राजकीय वर्तुळात आणखी एका नव्या हिबानामाची चर्चा सुरू झाली. अंबादास दानवे यांनी खासदार संदिपान भुमरे हे आपल्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्यामार्फत खोट्या हिबानामाच्या आधारे समृद्धी महामार्ग लगतच्या 23 एकर जमिनीचा मोबदला लाटू पाहत आहेत असा गंभीर आरोप केला होता. सुमारे साडेअकराशे कोटी रुपये बाजार मूल्य असलेली ही जमीन असल्याचा दावाही अंबादास दानवे यांनी केला होता. सर्व आरोपांवर खासदार संदिपान भुमरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अंबादास दानवे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

दानवे यांचे मानसिक संतुलन ढासळले असून विरोधी पक्षनेतेपदाचा लवाजमा आणि सत्तेतील सोयीसुविधांची सवय त्यांना लागली होती. मात्र सध्या आमदारकी गमावल्याने तसेच जिल्ह्यात पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने ते हताश झाले आहेत. या नैराश्यातूनच आपल्यावर निराधार आरोप केले जात असल्याचा दावा भुमरे यांनी केला.

या प्रकरणात आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून दानवे जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत. त्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नसून ते केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्ये करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Sandipan Bhumare
BJP Rajya Sabha Candidates : महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री राज्यसभेवर जाणार! भाजपच्या राहिलेल्या 3 जागांसाठी तावडेंसह दानवे, मुंडे, पाटील यांची नावे चर्चेत

हिबाहनामा प्रकरणाची चर्चा

हिबाहनामा प्रकरणात दानवे यांनी भुमरे यांच्यावर चालकाच्या नावे सुमारे ११५० कोटी रुपयांची जमीन केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीही भुमरे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. दरम्यान, येत्या दोन दिवसांत न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. सातत्याने टीका करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sandipan Bhumare
Cabinet Decision : मोठी बातमी: 'सेवा तीर्थ'च्या पहिल्याच बैठकीत रेल्वेच्या 3 मेगा प्रकल्पांना ग्रीन सिग्नल! 12,236 कोटींचा निधी मंजूर, महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

अंबादास दानवे खोटारडा माणूस

अंबादास दानवे सातत्याने माझ्यावर आणि माझा मुलगा आमदार विलास भुमरे यांच्यावर खोटेनाटे आरोप करत असतात यापूर्वी घरातील जिन्यावर पाय घसरून पडल्यानंतर झालेल्या अपघाताला अंबादास दानवे यांनी वेगळे वळण देत विलास भुमरे यांना मारहाण करण्यात आल्याचा खोटा आरोप केला होता. या प्रकरणातही मी त्यांच्या विरोधात पैठण न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भात 27 तारखेला सुनावणी देखील ठेवण्यात आली आहे. मुळे अंबादास दानवे यांच्या आरोपात कुठल्याही प्रकारचे तथ्य नसून त्यांना सातत्याने खोटे आरोप करण्याची सवय लागली आहे. हिबानामा प्रकरणात माझा ड्रायव्हर स्वतंत्रपणे मानहानीचा दावा दाखल करणार आहे. याशिवाय अंबादास दानवे यांनी काल पत्रकार परिषदेत माझे नाव घेऊन आरोप केल्यामुळे मी देखील स्वतंत्र मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे संदिपान घुमरे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com