Parbhani district Bank election news : परभणी जिल्हा बँकेची सूत्र पुन्हा वरपूडकर-बोर्डीकरांच्या हाती; विटेकरांची रसद विरोधकांना, तर सईद खान यांनी राखली भगव्याची शान!

Parbhani DCC Bank News : सुरेश वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महापालिकेत स्वबळावर कमळ फुलेल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना होता. मात्र येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस महाविकास आघाडीने बाजी मारली.
meghna bordikar, suresh warpudkar
meghna bordikar, suresh warpudkar Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti politics : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात कायम एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरलेले बोर्डीकर आणि वरपूडकर आता मात्र एकाच पक्षात आहेत. सुरेश वरपूडकर यांच्या भाजप प्रवेशानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महापालिकेत स्वबळावर कमळ फुलेल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांना होता. मात्र येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस महाविकास आघाडीने बाजी मारली.

त्याआधीच्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत मात्र भाजपची सरशी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र याची श्रेय पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना मिळाले. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्ताने आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले सुरेश वरपूडकर आणि रामप्रसाद बोर्डीकर, मंत्री मेघना बोर्डीकर पहिल्यांदाच एकत्र लढले. जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी या नेत्यांनी पॅचअप केले. परिणामी 21 संचालकांपैकी वरपूडकर आणि बोर्डीकर या दोन घरांमध्ये पाच संचालक पदे चालून आली आहेत . या जोरावरच आता वरपूडकर-बोर्डीकर यांनी संपूर्ण जिल्हा बँक ताब्यात घेतली आहे. राज्यात महायुती असली तरी परभणी जिल्ह्यात भाजप शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची भूमिका अनेकदा वेगवेगळी राहिली आहे.

meghna bordikar, suresh warpudkar
Parbhani district Bank : परभणी जिल्हा बँकेवर वरपूडकर बोर्डीकर गटाचे वर्चस्व कायम; महायुतीचा 21 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय!

नुकत्याच झालेल्या परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सईद खान यांच्या विरोधात भूमिका घेतली. विटेकर यांनी थेट महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांच्याकडे आपल्याकडची मते वळवली. त्यामुळे महायुतीच्या सईद खान यांचा सोपा वाटणारा विजय काहीसा अवघड झाला. आधीच सावध असलेल्या सईद खान यांनी साम-दाम-दंड-भेद या सर्व अस्त्रांचा वापर करत विजयश्री खेचून आणली.

meghna bordikar, suresh warpudkar
District Bank : सहकारातील घराणेशाही जोरात, परभणी जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे यांची सुनेसाठी माघार!

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजेश विटेकर यांनी विरोधकांनाच रसद पुरवल्याची चर्चा आहे. या खेळीतून त्यांच्या नात्यागोत्यांच्या राजकारणाची पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे या निवडणुकीत कुठे अस्तित्वच जाणवले नाही.

विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आलेल्या सईद खान यांनी एकट्याच्या जोरावर जिल्हा बँकेत स्वतःसह आपल्या भावालाही निवडून आणले. भावाची बिनविरोध निवड झाल्यानंतर सईद खान यांना मात्र जामकर यांच्या विरोधात काटे की टक्कर द्यावी लागली. इथेही त्यांच्या विजयाच्या मार्गात राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांनी अडथळा निर्माण केला होता. त्याला परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांची भक्कम साथ मिळाली. मात्र या सर्वांना सईद खान हे भारी ठरले.

meghna bordikar, suresh warpudkar
Parbhani District Bank Election: परभणी जिल्हा बँकेत आमदार सईद खान यांची एन्ट्री, विद्यमान उपाध्यक्षाचा मुलगाही संचालक मंडळात!

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय जाधव हे आषाढी वारीनिमित्त बाहेर असताना सईद खान यांनी जिल्हा बँकेत मिळवलेला विजय निश्चितच मोठा म्हणावा लागेल. जिल्हा बँकेत सईद खान यांनी खऱ्या अर्थाने भगव्याची शान राखली असे म्हणावे लागेल.

परभणी जिल्हा बँकेची निवडणूक 19 जुलै 2026 रोजी झाली. 21 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तेरा संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. यात प्रामुख्याने रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे-बोर्डीकर, भावना मुंगसे-बोर्डीकर यांचा समावेश होता. तर सुरेश वरपूडकर स्वतः आणि त्यांच्या प्रेरणा वरपूडकर यांचीही बिनविरोध निवड झाली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर, काँग्रेसचे सुरेश देशमुख, भगवान वाघमारे, राजेश पाटील गोरेगावकर, हिंगोली आणि दिग्विजय पाटील गोरेगावकर या दिग्गजांचा या बिनविरोध संचालकांमध्ये समावेश होता. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी बिनविरोधचा सेफ गेम खेळल्यानंतर उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.

meghna bordikar, suresh warpudkar
Parbhani District Bank Election: परभणी जिल्हा बँकेत आमदार सईद खान यांची एन्ट्री, विद्यमान उपाध्यक्षाचा मुलगाही संचालक मंडळात!

आता अध्यक्षपदावर डोळा!

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकांपैकी 17 संचालक हे वरपूडकर आणि बोर्डीकर समर्थक असल्याचे बोलले जाते. जिल्हा बँक ताब्यात आल्यानंतर आता अध्यक्षपदावरून पुन्हा बोर्डीकर आणि वरपूडकर यांच्या स्पर्धा असणार आहे. मात्र आता हे दोन्ही नेते एकाच पक्षात असल्यामुळे अध्यक्ष पदाचा तिढा सामोपचाराने सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सुरेश वरपूडकर यांना प्रथम अध्यक्षपदाची संधी आणि त्यानंतर उर्वरित काळात बोर्डीकरांपैकी एकाची अध्यक्षपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.

meghna bordikar, suresh warpudkar
Eknath Shinde: खासदार पुत्रासाठी एकनाथ शिंदेंची फोनाफोनी : शिवसेना आमदाराची थेट निवडणुकीतून माघार; कृष्णा पाटील आष्टीकरांचा मार्ग मोकळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com