CMO Dummy OSD News : मुख्यमंत्री शिंदेंसह अधिकाऱ्यांनाही 'या' ठाकरेंचा चकवा; डमी 'ओएसडी' होऊन हाकला CMO चा कारभार !

Eknath Shinde Dummy OSD News : "हा प्रकार उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाची अब्रू जाण्याच्या शक्यतेने तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे."
CMO Dummy OSD News
CMO Dummy OSD NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून सरकारमधील ढीगभर मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या दिमतीतील डझनभर ‘आयएएस’ आणि ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांना चकवा देत, एका डमी ‘ओएसडी’ने मुख्यमंत्री कार्यालयात तब्बल आठ महिने ‘राज’ केल्याचे वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना कळून चुकले आणि कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली. (Latest Marathi News)

बनावट नियुक्ती पत्र, मुख्यमंत्री सचिवालयाचे ओळखपत्र तयार करून या ‘ओएसडी’नेही सरकारच्या तिजोरीतून पगारही काढल्याचे दिसून आले आहे. गंभीर म्हणजे, मुख्यमंत्री कार्यालयातून फायली फिरवून या बहाद्दराने कॅबिनेट मंत्री, सचिव, आयुक्तांकडून ‘रिमार्क’ घेत, ‘कमाई’चे उद्योगही केल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्याच यंत्रणेवर धाक ठेवणाऱ्या या ‘ओएसडी’ची बनवाबनवी सह्याद्री अतिथिगृहातच मंगळवारी उडकीस आली.

CMO Dummy OSD News
Manoj Jarange Patil News : '' आरक्षण मिळेल नाहीतर, माझी अंत्ययात्रा...''; जरांगे पाटलांनी सरकारची मागणी दुसऱ्यांदा धुडकावली

या प्रकाराने मुख्यमंत्री कार्यालयाच आवाक झाले असून, यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांकडच्या सुरक्षा व्यवस्थेपासून त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेजबादारपणाकडे बोट दाखवले जात आहे. याआधीही मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून काहीजणांनी कामे उरकल्याच्या तक्रारी आहेत. त्यात आता तर थेट ‘ओएसडी’च बोगस निघाल्याने मंत्रालयातील कारभाराबाबतच उलटसुलट चर्चा आहे.

अचलपूर नगरपालिकेतील तृतीयश्रेणी कर्मचारी मयूर ठाकरे हा गेल्या आठ महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वावरत आहे. त्यापलीकडे सह्याद्री, वर्षा आणि नंदनवन या बंगल्यावरही त्याचा राबता होता. या ठिकाणांची नेत्यांची वर्दळ आणि त्यांच्याकडच्या कामांचे स्वरूप हेरून मयूर याने मुख्यमंत्रयांचा ‘ओएसडी’ असल्याचे भासवले. त्याचा फायदा होत असल्याचे लक्षात येताच त्याने अचलपूर नगरपाालिकेतून थेट मंत्रालयात तेही मुख्यमंत्री सचिवालयातच रूजू झाल्याचे दाखवून दिले. त्यासाठी खोटे नियुक्तीपत्र, त्याआधी प्रतिनियुक्तीचा आदेश तयार केला. ते दाखवून तो अचलपूर नगरपालिकेतून बाहेर पडला. त्यानंतर खास ओळखपत्रही तयार करून घेतले.

ही कागदपत्रे हातात ठेवून मयूर ठाकरेने मुख्यमंत्री सचिवालयात जम बसविला. त्यातून नेते, बिल्डर, ठेकेदारांच्या फायली घेऊन त्या मार्गी लावू लागला. साऱ्या यंत्रणेदेखत हे घडूनही मयूर ठाकरेबाबत कोणाला, कधीच काडीचाही संशय आला नाही. त्याला कोण्या एका अधिकाऱ्याने कधी हटकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचे धाडस वाढले. राज्यभरातील ‘आयएस‘ आणि ‘आयपीएस’अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून वाटेल ती कामेही करून घेतल्याचे बोलले जात आहे.

CMO Dummy OSD News
Kolhapur Politics : 'फडणवीस माफीनामा नको, राजीनामा द्या'; कोल्हापुरात मराठा आंदोलकांची आग्रही मागणी !

त्यातून मयूरने खूप काही पदरात पाडून घेतल्याचेही स्पष्ट आहे. मात्र, सह्याद्री अतिथिगृहातील बैठकांमध्ये मयूरची धावपळ पाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी मयूरकडे चौकशी केली. तिथे त्याने गडबडीत असल्याचा बहाणा करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच या प्रकाराबाबत ‘सरकारनामा’ने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे चौकशी केली. त्यानंतर मात्र, अधिकाऱ्यांचा मयूरवरचा संशय बळावला आणि त्याची झाडाझडती घेतली. त्यात मयूरने सरकारी यंत्रणेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.

बनावट कागदपत्रे जमविण्यापासून पगार मिळवण्यापर्यंतची कामे केली आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या कार्यालयात प्रचंड व्यवस्था असतानाही मयूर ठाकरे हा ‘डमी’ ओएसडी कसा झाला, हे कोणाच्या निदर्शनास कसे आले नाही, अशा प्रश्‍नांनी मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी चक्रावून गेले. परंतु, हा प्रकार उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाची अब्रू काढली जाण्याच्या शक्यतेने तो लपवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

CMO Dummy OSD News
Jalna Maratha Protest : दुतोंडी सरकारच्या ढोंगीपणाचा बुरखा फाटला; ठाकरे गटाचा शिंदे-फडणवीस-पवारांवर हल्लाबोल

याआधी आषाढी एकादशीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पंढरपूर दौऱ्यातही ‘ओएसडी’ असल्याचे सांगून एका कार्यकर्त्याने पोलिसांनाच कामाला लावल्याचे उघड झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून १३ ‘ओएसडी’ असून, त्यातील प्रत्येकाकडे कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रचंड गर्दीत अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील व्यवस्थांना भेदून मंत्रालयात या ठाकरेने ‘राज’ केल्याचे आता उघड आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com