BRS News : केसीआर यांच्या विरोधातील नाराजी जाधवांना भोवली, राज्य समितीत डावलले...

KCR : मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बंगल्यात मौलाना यांना थेट प्रवेश, आपल्या शेजारी बसवल्यामुळे जाधव प्रचंड नाराज झाले.
BRS News
BRS NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सर्वप्रथम बीआरएस पक्षात प्रवेश करणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना बीआरएसच्या राज्य समितीत स्थान मिळाले नाही. (BRS News) याउलट त्यांच्यानंतर भारत राष्ट्र समितीची वाट धरणाऱ्या माने पिता-पुत्र, कदीर मौलाना आणि फेरोज पटेल यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. आक्रमक आणि बीआरएसची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या जाधवांना का डावलण्यात आले ?

BRS News
Guardian Ministers News : धनंजय मुंडेंकडे मोठी जबाबदारी; बीडचे पालकमंत्रीपद, तर लातूर बनसोडेंकडे

या मागे त्यांनी मध्यंतरी थेट केसीआर यांच्याबद्दलच जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्यामुळे ते दुखावल्याची चर्चा आहे. (Marathwada) जिल्ह्यातील बीआरएसच्या दुसरे समन्वयक कदीर मौलाना यांनी एका कार्यक्रमात `औरंगजेब मेरे आदर्श है`, असे वादग्रस्त विधान केले होते. यावर (Harshvardahan Jadahav) जाधव यांनी सोशल मिडियामध्ये शेअर करत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मौलाना यांच्यावर टीका केल्यानंतर बीआरएसकडून त्यांच्यावर कारवाई होईल, किंवा त्यांना समज दिली जाईल, अशी अपेक्षा होती.

मात्र पक्षाने मौलाना यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, म्हणत हात झटकले. हर्षवर्धन जाधव यांनी देखील हीच भूमिका पत्रकार परिषद घेवून मांडली. (Kannad) परंतु औरंगजेबाला आदर्श मानत असल्याचे विधान केल्यानंतर पक्षाने त्यांना दूर ठेवण्याऐवजी अधिक जवळ केले. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बंगल्यात मौलाना यांना थेट प्रवेश, आपल्या शेजारी बसवल्यामुळे जाधव प्रचंड नाराज झाले.

सोशल मिडियावर व्हिडिओ करत जाधव यांनी थेट केसीआर यांच्याबद्दलच नाराजी व्यक्त केली. केसीआर यांच्या परवानगीशिवाय पक्षी देखील त्यांच्या बंगल्यात शिरू शकत नाही. मग औरंगजेबाला आदर्श मानणाऱ्या कदीर मौलाना यांना केसीआर आपल्यासोबत घेऊन कसे बसू शकतात ? हे चुकीचे झाले, अशा शब्दात जाधव व्यक्त झाले होते. कदाचित हा राग मनात धरूनच जाधव यांना बीआरएसच्या राज्य समितीत स्थान देण्यात आले नसावे, अशी चर्चा आहे.

जिल्ह्यातील माने पिता-पुत्र, कदीर मौलाना यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत मेळावे, पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणावर घेतले. पण जाधव यांनी मात्र बीआरएसचा प्रचार, प्रसार करण्याऐवजी आपला वैयक्तिक अजेंडाच राबवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जातो. जिल्ह्यातील महत्वाच्या तीनही नेत्यांना राज्य समितीत स्थान दिल्यामुळे सहाजिकच जाधव दुखावले गेले आहेत. त्यामुळे पुढील काळात ते काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com