Guardian Ministers News : धनंजय मुंडेंकडे मोठी जबाबदारी; बीडचे पालकमंत्रीपद, तर लातूर बनसोडेंकडे

Maharashtra Politics : राज्यात पालकमंत्री आदलाबदलाच्या हालचालींना वेग आला आहे
Guardian Ministers News
Guardian Ministers News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यातील तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता राज्यातील पालकमंत्र्याच्या आदलाबदली होणार असून त्यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना सुरूवात झाली आहे. विशेषत: पुण्यासह लातूर,बीड, भंडरा गोंदिया जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचीही आदलाबदल होणार आहे. पालकमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला आहे.मंत्री चंद्रकातं पाटील यांच्याकडे सध्या पुण्याचे पालकमंत्रीपद आहे, ते अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं जाऊ शकतं. त्यामुळे एकदा सरकारमधील मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा सरकारमधील तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Guardian Ministers News
Telangana Model News : महाराष्ट्रातील शेतकरी-कार्यकर्ते जाणून घेणार काय आहे 'तेलंगणा मॉडेल'

सत्तासंघर्षानंतर राज्यात काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या अदलाबदली होणार असल्याची माहिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला पालकमंत्रीपदेही मिळणार आहेत. पालकमंत्र्यांच्या संभाव्य बदलांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एखदा पुण्याचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते. या बदलाला मंत्री चंद्रकांत पाटील विरोध करू शकतात, पण यासंबंधीचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचीही माहिती आहे.

Guardian Ministers News
Telangana Model News : महाराष्ट्रातील शेतकरी-कार्यकर्ते जाणून घेणार काय आहे 'तेलंगणा मॉडेल'

याशिवाय, नव्या बदलांनुसार धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद , मंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यासोबत, संजय बनसोडे यांच्याकडे लातूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी, धर्मरावबाबा आत्राम यांना भंडारा-गोंदियाच्या पालकमंत्रीपद आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे.

पुणे जिल्हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे त्यांचे सर्वाधिक लक्ष असते. विरोधी बाकावर असतानाही ते पुण्यात त्यांच्या सातत्याने बैठका व्हायचा. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते नेत्यांना तेच पालकमंत्रीपदी हवे आहेत. तर दुसरीकडे सद्यस्थितीत पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपकडे आहे. त्यामुळे हे पद हातातून निसटले तर त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या बदलांत पुण्याचे पालकमंत्रीपद कुणाला मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By - Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com