Bajrang Sonwane: खासदाराच्या होमपिचमध्ये तिढा; उमेदवारी कुणाच्या पारड्यात पडणार?

Cage Assembly election 2024 Prithviraj Sathe Sangeeta Thombre Anjali Ghadge: लोकसभा निवडणुकीत काही वर्षांत केज मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला मताधिक्क्य मिळाले आहे. बजरंग सोनवणे यांच्या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढतच आहे.
Cage Assembly election 2024
Cage Assembly election 2024 Sarkarnama
Published on
Updated on

Beed News: खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचे होमपिच असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इच्छुकांची संख्या रोजच वाढत आहे. सोनवणे यांच्या ग्रीन सिग्नलमुळे पक्षात एंट्री करणाऱ्या प्रत्येकालाच उमेदवारीची अपेक्षा आहे. त्यामुळे येथील विधानसभा उमेदवारीचा पेच सोनवणे कसा सोडवितात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी आमदार पृथवीराज साठे यांच्यानंतर भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे, डॉ. अंजली घागडे, रमेश गालफाडे अशी उमेदवारीसाठीच्या स्पर्धकांची यादी तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मागच्या काही वर्षांत केज मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला मताधिक्क्य मिळाले आहे. त्यातच बजरंग सोनवणेंच्या माध्यमातून खासदार पद केजला आले आहे. त्यामुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.

2012 मध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत पृथवीराज साठे राष्ट्रवादीकडून विधीमंडळात पोचले. मागच्या वर्षी पक्षफुटीनंतर ते ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या बाजूने कायम राहीले. सॉफ्ट चेहरा अशी त्यांची प्रतिमा असलेले पृथवीराज साठे पाच वर्षांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत.

त्यामुळे त्यांनाही शरद पवारांकडून न्याय मिळेल, अशी खात्री वाटते. तर, 2012 मध्ये झालेल्या पराभवानंतर 2014 साली भाजपकडून विजयी झालेल्या आणि 2019 सालच्या निवडणुकीत भाजपने उमेदवारी काटलेल्या संगीता ठोंबरे यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे संपर्क वाढविला आहे. त्यांनी थेट उमेदवारीसाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसमोर मुलाखतही दिली आहे.

Cage Assembly election 2024
Khadakwasala Assembly Election: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ; चार निवडणुका वेटिंग असलेल्या नेत्याने दिला इशारा

2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणुक लढलेल्या व भाजपमार्गे शिवसेनेत गेलेल्या डॉ. अंजली घागडे यांनीही दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचेही मतदारसंघात दौरे सुरु आहे. त्यांच्या समर्थकांनाही आता उमेदवारीची खात्री वाटत आहे.

रमेश गालफाडे यांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचेही मतदारसंघात दौरे सुरु आहेत. इतरही नेते पक्षाकडून इच्छुक आहेत. आता उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी वाढत असल्याने या उमेदवारीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार आणि बजरंग सोनवणेंचे वजन कोणाच्या पारड्यात पडणार हे पहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com