Khadakwasala Assembly Election: शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चढाओढ; चार निवडणुका वेटिंग असलेल्या नेत्याने दिला इशारा

Khadakwasala Assembly constituency NCP Sharad Pawar Party Kaka Chavan: गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सचिन दोडके यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. काका चव्हाण यांनी देखील जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Khadakwasla Assembly election
Khadakwasla Assembly electionSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महाविकास आघाडीमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे राहावा यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रयत्नशील आहे. सध्या तरी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपल्याकडे राखेल असं चित्र आहे. असं असलं तरी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी तब्बल नऊ जण इच्छुक आहे.

इच्छुकांकडून मतदारसंघांमध्ये जोरदार पोस्टरबाजी देखील करण्यात येत आहे. सध्या ही पोस्टरबाजी चर्चेत असतानाच खडकवासला विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण (Kaka Chavan) यांनी उमेदवारी न मिळाल्यास वेगळा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये संघर्ष बळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या काही वर्षांपासून खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातून सलग तीन वेळा भाजपचे भीमराव तापकीर हे निवडणूक जिंकले आहे. मात्र मागील निवडणुकीमध्ये त्यांना निसटचा विजय मिळाला अवघ्या काही हजार मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामधून भाजपच मोठा लीड कमी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला यश आला आहे. त्यामुळे या मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठ्या आशा आहे. त्यामुळे इच्छुकांनची संख्या देखील मोठी आहे.

Khadakwasla Assembly election
Raj Thackeray: तिकीट नाकारलेल्या बंडखोरांवर मनसे लावणार डाव? ताकदवान उमेदवारांना वळवणार

गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर सचिन दोडके (Sharad Pawar)यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष काका चव्हाण यांनी देखील जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात करत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माध्यमाशी बोलताना चव्हाण म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून मी या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. 2009, 2011, 2014 आणि 2019च्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतो. मात्र पक्षाने मला उमेदवारी दिली नाही. मात्र तरी देखील जोमाने पक्षाचे आणि उमेदवाराचे काम केले.

मात्र, मागील चारही निवडणुकांमध्ये आम्हाला यश मिळू शकले नाही. त्यामुळे ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून यंदा मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. जर पक्षाने विचार केला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीनंतर नक्की वेगळा विचार करावा लागेल. मात्र माझी भावना समजून पक्ष नेतृत्वा योग्य निर्णय घेईल, असा विश्वास असले तर त्यांनी सांगितलं.

ठाकरे गटही आग्रही

या विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट देखील आग्रही आहे. या हा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा आणि उमेदवारी द्यावी असा आग्रह नुकतेच शिवसेना ठाकरे गटात दाखल झालेले वसंत मोरे यांनी धरला आहे. या भागामध्ये गाठीभेटी सुरू असून त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात पोस्टर्स या भागात लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com