Manoj Jarange Patil : सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणाऱ्या जरांगेंनी निवडणूक लढवावी का? सर्वेक्षणात 'ही' मोठी माहिती समोर

Election Survey 2024 : महायुतीला उच्च वर्णीय,मराठा आणि इतर मागास जाती आणि दलितांच्या प्रतिसादकर्त्यांमध्ये महायुती अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. महायुतीला उच्चवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचेही समोर आले आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा समाजासाठी मोठा लढा उभारुनही सरकारकडून आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे,याबाबत जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये मोठा निर्णय घेतला आहे.

त्यांचा फॉर्म्युला ठरला असून पुढील दोन-तीन दिवसांत कुठल्या मतदारसंघात उमेदवार पाडायचे आणि कुठल्या मतदारसंघात उमेदवार उभे करायचे,याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याबाबत सकाळच्या सर्वेक्षणातून मोठी माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील 'सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज'(सीएसडीएस) आणि पुण्यातील 'एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट' (सॉग) यांच्या 'लोकनीती' कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास 2024 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी की नाही याची आकडेवारी समोर आली.

मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी का? याबाबत या सर्वेक्षणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक लढवू नये असं मत 35 टक्के मत लोकांचं आहे.तर निवडणूक लढवावी असं 40 टक्के लोकांना वाटतं.याबाबत काहीही मत न नोंदवल्याची टक्केवारी 25 इतकी आहे.

Manoj Jarange Patil
MNS Worli Constituency News : ..तरीही 'मनसे'ने वरळी मतदारसंघातूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरवला उमेदवार!

'आपण फक्त 30 ते 40 दिवस राजकारणात...'

मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरला जात आहे. पण त्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसेच आपण फक्त 30 ते 40 दिवस राजकारणात आहे. मला आणि माझ्या समाजाला उघडं पडू देऊ नका, माझा विश्वासघात होऊ देऊ नका, हे आश्वासन द्या. पाडा म्हणणारे आणि उभे करा म्हणणारेही माझ्यासाठी सारखेच. आंदोलन आणि मी उघडे पडले तर आपली जात संपेल, असे जरांगे म्हणाले.

'..तर भाजपवाले खूष होतील!'

महायुती असो की महाविकास आघाडी हे सख्खे मावसभाऊ आहेत. इकडे उभा करा आणि पाडा म्हणणारे, हेही मावसभाऊ आहेत. आपण उमेदवार उभे केले तर भाजपवाले खूष होतील.आपण उभे केले नाहीत तर महाविकास आघाडीवाले खूष होतील.दोघे म्हणत नाहीत,आम्ही आरक्षण देतो, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.भाजपची पहिली यादी आल्यानंतर आता जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत 24 तारखेला सकाळपासूनच जिल्हानिहाय बैठकांचे नियोजन केले आहे.

Manoj Jarange Patil
MNS Candidates List 2024 : मोठी बातमी! मनसेची दुसरी यादी जाहीर, अमित ठाकरेंसह 'या' दिग्गज नेत्यांना उमेदवारी

जातीसमुदायानुसार पसंती..

विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर आधी विविध जाती-जमातींच्या मतदारांचे दोन आघाड्यांच्या बाजूने आणि विरोधात ध्रुवीकरण झाले आहे.त्यावरुन या युती आणि आघाडीत चुरशीची लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

महायुतीला उच्च वर्णीय,मराठा आणि इतर मागास जाती आणि दलितांच्या प्रतिसादकर्त्यांमध्ये महायुती अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. महायुतीला उच्चवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेल्या लोकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचेही समोर आले आहे.

Manoj Jarange Patil
Nitesh Rane : 'हिंदूंचा गब्बर राणें'नी सांगितली हिंदूंची 'कट्टर' व्याख्या; काय रिअ‍ॅक्शन येणार?

मात्र, या दोन्ही आघाड्यांमध्ये कुणबी समाज सारखाच विभागला गेल्याचेही पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्रातील एकूण मतदारांपैकी जवळपास 12 टक्के असलेल्या मुस्लिम मतदारांची पहिली पसंती महाविकास आघाडीला आहे. राज्यातील शेतकर्‍यांचीही मोठ्या प्रमाणावर पसंती ही 'मविआ'लाच असल्याचे समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com