राज्यसभेच्या माध्यम सल्लागार समितीचे सचिव बागाईतकर यांचा राजीनामा

पत्रकारांच्या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने काहीच निर्णय घेतला नाही.
Anant Bagaitkar

Anant Bagaitkar

sarkarnama

Published on
Updated on

दिल्ली : राज्यसभेच्या (Rajya Sabha) माध्यम सल्लागार समितीचे सचिव अनंत बागाईतकर (Anant Bagaitkar) यांनी राजीनामा दिला आहे. ते सकाळ माध्यमाचे दिल्ली ब्यूरो चीफ आहेत. ही समिती राज्यसभेत प्रसार माध्यमांबाबत शिफारस देत असते. कोरोनाचे कारण देत केंद्र सरकारने पत्रकारांना संसदेत (Parliament) येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे बागाईतकर यांनी राजीनामा दिला.

Anant Bagaitkar

शिवसेना खासदाराच्या मातोश्रींनीही सोडली पक्षाची साथ

पत्रकारांना संसदेत प्रवेश देण्यात यावा, यासाठी दिल्लीमध्ये पत्रकारांनी मोर्चाही काढला होता. त्यावेळीही बागाईतकर यांनी आपली भूमिका मांडली होती. मात्र, पत्रकारांच्या आंदोलनानंतरही केंद्र सरकारने काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे अखेर बागाईतकर यांनी व्यथित होऊन आपला राजीनामा दिला आहे.

Anant Bagaitkar

Anant Bagaitkar

sarkarnama

Anant Bagaitkar

संसदेत माध्यमांची आडवाआडवी; पत्रकारांवर मोर्चा काढायची वेळ

अनंत बागाईतकर ह्यांनी गेली तीस वर्षे संसदेत वार्तांकन केले आहे. त्यांनी लोकसभेच्या माध्यम सल्लागार समितीवरही काम केले आहे. कोरोना काळात पत्रकारांच्या संसदेतील प्रवेशवर मर्यादा आणण्यात आली. आता कोरोना काळ संपला तरी पत्रकारांना प्रवेश देण्यात अडचणी आणल्या जात आहेत. त्याचा निषेध व्यक्त करत बागाईतकर यांनी राजीनामा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com