Caste Verification: आणखी एक कुणबी जातवैधता प्रमाणपत्र फेटाळलं! कुटुंबाचा आक्रोश, मुलांचं उच्च शिक्षण धोक्यात

Caste Verification: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बाधणी गावातील शीतल सोनवणे या विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचे जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आले.
Maratha Protestors
Maratha ProtestorsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बाधणी गावातील शीतल सोनवणे या विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबातील आणखी एका विद्यार्थ्याचे जात वैधता प्रमाणपत्र फेटाळण्यात आले. त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांचे कुणबी जातीचे पुरावे असूनही त्यांच्या पूर्वीचे कोणतेही पुरावे नसल्यानं त्यांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे.

या विद्यार्थ्यांचा उच्चशिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला असताना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही, तर मिळालेली शैक्षणिक सवलत रद्द होण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे झाल्यास पूर्ण शैक्षणिक शुल्क भरणे या विद्यार्थ्यांच्या पालकांना शक्य नाही. त्यामुळे न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करावी लागेल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

Maratha Protestors
Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंविरोधातील आंदोलनाला गंभीर वळण : उपोषणकर्त्यंची प्रकृती खालावली, पोलिसांची धावपळ

गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेले जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी (ता. २८) वैजापूर शहरातील फुलेवाडी परिसरातील जलकुंभावर चढून आंदोलन केले. अखेर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोबाईलवरुन संवाद साधल्यानंतर आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तब्बल दोन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यातील खरज येथील सृष्टी उदय सोनवणे, खुशी ज्ञानेश्वर सोनवणे, सार्थक कल्याण सोनवणे आणि शीतल योगेश सोनवणे या भावंडांनी आठ महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यांच्या पूर्वजांच्या कागदपत्रांत ‘कुणबी’ तर खापर पंजोबांच्या नोंदीत ‘मराठा’ असा उल्लेख असल्याने कार्यालयाकडून आक्षेप घेण्यात आल्याने प्रमाणपत्र प्रलंबित आहे.

दुसरीकडे, नाशिक येथील संदीप फाउंडेशनमधील अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, महाविद्यालयाने प्रमाणपत्र अनिवार्य केले आहे. प्रवेशाची मुदत संपत आल्याने आणि कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही हाती काहीच लागत नसल्याने पालकांमध्ये मोठी अस्वस्थता होती.

याच नैराश्यातून उदय सोनवणे आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांनी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आक्रमक पवित्रा घेत जलकुंभावर चढून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलिस उपअधीक्षक विनय सोनावणे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले.

'प्रमाणपत्र कसे घ्यायचे, ते मी पाहतो'..

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी मराठा आंदोलनाशी संबंधित गणेश कदम यांनी मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधला. जरांगे यांनी थेट सोनवणे यांच्याशी फोनवर चर्चा केली. 'तुम्ही खाली उतरा, उद्यापासून आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून प्रमाणपत्र कसे घ्यायचे, ते मी पाहतो', असा शब्द जरांगे यांनी दिला. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

Maratha Protestors
Gokul Election : गोकुळमध्ये मोठी राजकीय घडामोड : भाजप आमदारांसह अदृश्य शक्तींना हायकोर्टाचा झटका; मुश्रीफ-कोरेंच्या मनासारखं घडलं!

महाविद्यालयाकडून सहकार्याची भूमिका

आंदोलन लांबत असल्याचे पाहून पोलिसांच्या गोपनीय विभागाचे ज्ञानेश्वर मेटे यांनी स्वतः जलकुंभावर चढून सोनवणे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी थेट महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सहकार्याचे आश्वासन मिळवून दिले. या सर्व घडामोडींनंतर आंदोलक सुरक्षितपणे खाली उतरण्यास तयार झाले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे फुलेवाडी रोड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com