Shivsena UBT News : खैरेंचा मुहूर्त चुकला; तर दानवेंनी टाइमिंग साधले...

A spark of controversy ignited in the Shivsena Thackeray faction : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी पेटली. उमेदवारीवरून दोघांमध्ये रस्सीखेच होती.
Chandrakant Khaire, Ambadas Danve
Chandrakant Khaire, Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीची घोषणा अवघ्या काही तासांवर असताना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटामध्ये वादाची ठिणगी पेटली आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी चांगला मुहूर्त साधत प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन केले. कुठलेही शुभकार्य शुभ मुहूर्तावर आणि विधिवत पूजा करून सुरू करण्यावर खैरे यांचा कायमच भर राहिला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसंवाद दौऱ्यावर असताना निवडणूक प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन करण्याचा मुहूर्त या वेळी मात्र चुकल्याचे सुरू झालेल्या वादावरून दिसते. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून खैरे आणि दानवे यांच्यामध्ये रस्सीखेच होती. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर सर्वानुमते पुन्हा एकदा खैरे यांनाच उमेदवारी देण्याचा निर्णय झाला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) शिवसेना-भाजप युती असूनही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एका बड्या मंत्र्याच्या आदेशावरून खैरेंच्याच विरोधात काम केल्याचा आरोप केला जातो, तर दुसरीकडे अंबादास दानवे यांच्यासह खैरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी त्याला खतपाणी घालत पराभवाला हातभार लावल्याचा आरोपही खैरे यांनी वेळोवेळी केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभूत झालेल्या चंद्रकांत खैरे यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे.

अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खैरेंच्या बाजूने आपला कौल दिल्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जाते. मात्र, मुंबईतल्या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अशी कुठलीही पसंती खैरे यांच्या नावाला दिली नव्हती, असा दावा करत दानवे यांनी आपला क्लेम कायम ठेवला होता.

Chandrakant Khaire, Ambadas Danve
Ajit Pawar : अजितदादांची 'बारामती'त मोर्चेबांधणी! म्हणाले, 'शब्द जपून देतो, पण...'

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे भिजत घोंगडे आणि वरिष्ठांकडून तयारीला लागा असे, आदेश मिळाल्यामुळे चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी चांगला मुहूर्त शोधत प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकून घेतले. अर्थात या कार्यक्रमाला खैरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर उद्या आपल्यावर बोल नको म्हणून काही दानवे समर्थकांनी कानोसा घेण्यासाठी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

या कार्यक्रमावरून व्हायचा तो गोंधळ झालाच. खैरेंनी स्तंभपूजनासाठी निवडलेला मुहूर्त चुकला की काय ल? अशी शंका आता दानवे यांनी केलेल्या लोकसभा उमेदवारीच्या दाव्यानंतर उपस्थित केली जाऊ लागली आहे. खरंतर गेल्या महिनाभरापासून चंद्रकांत खैरे हेच संभाजीनगरातील उमेदवार असतील हे स्पष्ट झालेले असल्यामुळे दानवे यांनीही यावर गेल्या काही दिवसांत भाष्य केल्याचे दिसून येत नाही. मग आता ऐन लोकसभा निवडणुकीची घोषणा होत असताना दानवे यांनी हे टायमिंग का साधले? याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना शिंदे गट छत्रपती संभाजीनगरची जागा आपल्याकडेच हवी यासाठी आग्रही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली असून, ते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील भाजपच्या नेत्यांशीही ते चर्चा करत आहेत. येत्या एक-दोन दिवसांत संभाजीनगरमधून भाजप लढणार की शिवसेना शिंदे? हे स्पष्ट होणार आहे.

त्यातच अंबादास दानवे यांच्या शिंदे गटातील पक्ष प्रवेशाची चर्चा नव्याने घडवून आणली जात आहे. दानवे यांनी या सगळ्या गोष्टींचे खंडन केले असले तरी लोकसभा लढवण्यासाठी आपण गेल्या दहा वर्षांपासून इच्छुक असल्याचे सांगत कुठेतरी या चर्चेमागे उमेदवारी मिळणार नसल्याची नाराजी असल्याचे दाखवून दिले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून संभाजीनगरमध्ये पुन्हा विजयाची मशाल पेटवायची असेल तर उद्धव ठाकरे यांना आधी या गटबाजीचा बंदोबस्त करावा लागणार आहे. भाजप आणि महायुतीतल्या घटक पक्षांना तसेच एमआयएमला मात्र शिवसेना ठाकरे गटातील या वादामुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या असणार हे वेगळे सांगायला नको. आता महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या खैरे- दानवे वादावर कसा मार्ग काढतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Chandrakant Khaire, Ambadas Danve
Rahul Gandhi News : "हा कसला ढाण्या वाघ हा, तर पळपुटा...", शिंदे गटानं 'तो' फोटो ट्विट करत गांधींची उडवली खिल्ली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com