Rahul Gandhi News : "हा कसला ढाण्या वाघ हा, तर पळपुटा...", शिंदे गटानं 'तो' फोटो ट्विट करत गांधींची उडवली खिल्ली

Naresh Maske On Rahul Gandhi : राहुल गांधींची यात्रा ठाण्यात दाखल होण्यापूर्वी नरेश मस्केंनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.
eknath shinde rahul gandhi
eknath shinde rahul gandhisarkarnama
Published on
Updated on

ठाणे : 16 मार्च | काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सांगता 17 मार्चला मुंबईत होणार आहे. ही यात्रा ठाण्यातून जाणार असल्यानं शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती. यातील काही "बॅनर्संवरती भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात," असा उल्लेख करत काँग्रेसकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याला आता माजी महापौर नरेश मस्के यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

eknath shinde rahul gandhi
Congress Nyay Yatra : न्याययात्रेचा समारोप अन् इंडिया आघाडी फुंकणार लोकसभेचं रणशिंग; असा आहे 'इंडिया'चा प्लॅन

नरेश मस्के यांनी 'एक्स' अकाउंटवर एक ट्विट केलं आहे. "अहो हा कसला ढाण्या वाघ, हा तर पळपुटा पप्पू," असं ट्विट करत नरेश मस्केंनी ( Naresh Maske ) राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुजरातमधून 'भारत जोडो न्याय यात्रा' ( Bharat Jodo Nyay Yatra ) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या यात्रेचं ठाण्यात स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या ठाण्यातील निवासस्थानाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर "भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात येतोय" अशा आशयाचे बॅनर लावून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला होता, तर राहुल गांधींची यात्रा ठाण्यात दाखल होण्यापूर्वी नरेश मस्केंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

eknath shinde rahul gandhi
Kapil Patil News : 'राहुल गांधी येवो अथवा अन्य कोणी, भिवंडी लोकसभेच्या निकालात...' ; कपिल पाटलांचा दावा!

नरेश मस्केंनी एक फोटो पोस्ट केलाय. त्यावर लिहिलं की, "काँग्रेसवाल्यांनी बॅनर लावले आमच्या ठाण्यात.... राहुल गांधी 'भारताचा ढाण्या वाघ ठाण्यात...' अहो हा कसला, ढाण्या वाघ ! हा तर पळपुटा पप्पू ...!"

तसेच, मस्केंनी पोस्ट केलेल्या फोटोत लिहलं, "हा कसला ढाण्या वाघ हा तर पळपुटा पप्पू... याचा परिवार देशाचा ७० वर्षे खिसाकापू. काहीतरी बडबडून तिथून पळून जातो स्वतः अन्याय करून मग न्याय मागत फिरतो. नखाचीही सर नाही, ज्यांच्या त्या सावरकरांचा अपमान करतो. म्हणून मग सदैव गडबड्या पप्पू ठरतो."

R

eknath shinde rahul gandhi
Anand Paranjape News : 'मुख्यमंत्र्यांनी तटकरेंना आश्वासित केल्याने शिवतारेंच्या विषयावर..' ; परांजपेंनी केलं स्पष्ट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com