Chandrakant Khaire News : `चांगली गोष्ट आहे`, जाधवांच्या पाठिंब्यावर खैरेंची सावध प्रतिक्रिया..

Aurangabad : हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका विधानसभेचे गणित डोक्यात ठेवूनच घेण्यात आली आहे.
Ex.Mla Harshvardhan Jadhav-Chandrakant Khaire News, Aurangabad
Ex.Mla Harshvardhan Jadhav-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार असतील असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपुर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी खैरेंना लोकसभेसाठी आपला पाठिंबा जाहीर केला. आपण विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत, हे सांगतांनाच आता खैरेच पुन्हा खासदार असतील, माझा त्यांना पाठिंबा असेल असेही जाधव यांनी जाहीर केले.

Ex.Mla Harshvardhan Jadhav-Chandrakant Khaire News, Aurangabad
Imtiaz Jalil : शरद पवारांच्या बाजूला बसण्याची ताकद ठेवतो, जुने दिवस आता गेले..

आता या पाठिंब्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न खैरे (Chandrakant Khaire) यांना पडला. कारण ज्या जाधव यांच्या उमेदवारीमुळे खैरेंची पाचव्यांदा लोकसभेवर निवडून जाण्याची संधी हुकली त्यांच्याच पाठिंब्याच्या विधानावर हुरळुन जाणे खैरेंना तुर्तास तरी मान्य नाही. (Shivsena) तरी देखील जाधव यांच्यावर टीका न करता खैरे यांनी फक्त `चांगली गोष्ट आहे`, या तीन शब्दातच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे सध्या जाधव यांच्या पाठिंब्यावर फार उत्साहात बोलायचे नाही, अशीच भूमिका खैरे यांनी घेतल्याचे दिसते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची लाॅटरी लागली. पण या निकालाचा परिणाम मतदारांवर इतका झाला की, या पराभवाचा वचपा जिल्ह्यातील शिवसेना-भाजपच्या सगळ्या जागा निवडून देत काढला. हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंच्या विरोधात शड्डू ठोकला आणि थोडेथिडके नाही, तर तब्बल २ लाख ८३ हजार मते मिळवली. खैरेंचा विजय याच मतांनी हिरावला गेला आणि एमआयएमचा झेंडा शिवसेनेच्या बालेकिल्यात फडकला.

लोकसभेत विजय मिळवल्यानंतर मतमोजणी केंद्रातच हर्षवर्धन जाधव आणि इम्तियाज जलील यांनी घेतलेली एकमेकांची गळाभेट त्यावेळी चांगलीच गाजली होती. खैरेंचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता, उद्धव ठाकरे यांनी तर हा पराभव खैरेंचा नाही, तर माझा समजतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जाधव यांच्यामुळे खैरे पडले याचा राग मतदारांनी हर्षवर्धन जाधव यांना पराभूत करून काढला होता. त्यामुळे त्यांचे राजकारणही संपुष्टात आल्यासारखी परिस्थिती होती.

कौटुंबिक वाद आणि राजकारणातून बोहर फेकल्या गेलेल्या हर्षवर्धन जाधव यांना कन्नड-सोयगाव मतदारसंघातून संजना जाधव यांच्याकडून आव्हान दिले जात आहे. सोयगांव येथील एका कार्यक्रमात तर संधी मिळाली तर आपण कन्नड-सोयगांवमधून विधानसभा लढवणार असल्याचे देखील संजना यांनी स्पष्ट केले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील आपल्या मुलीला आमदार करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Ex.Mla Harshvardhan Jadhav-Chandrakant Khaire News, Aurangabad
Devendra Fadnavis : 'काही लोकांना २ वेळा उद्घाटन करण्याचा शौक असतो'

अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंना पाठिंबा देण्याची घेतलेली भूमिका विधानसभेचे गणित डोक्यात ठेवूनच घेण्यात आली आहे. खैरे यांना मानणारा मोठा मतदार कन्नड-सोयगांव आणि जिल्ह्यात आहे. तर जाधव हे विधानसभेला पराभूत झाले असले तरी कन्नड मतदारसंघात स्व. रायभान जाधव यांची पुण्याई अजूनही हर्षवर्धन यांच्या पाठीशी आहे.

त्यामुळे या पाठिंब्यातून दोघांनाही एकमेकांचे हित साध्य करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच खैरेंनी जाधव यांच्या पाठिंब्यावर कुठल्याही प्रकारची टीका न करण्याची भूमिका घेतल्याचे दिसते. आता जाधव आपल्या भूमिकेवर कितीकाळ ठाम राहतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com