Shivsena Vs BJP Politics : धुळे महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकालावधीत भाजपने शहर विकासासंदर्भात हजारो कोटींचा निधी आणल्याचा दावा केला. मग, सत्तेतून बाहेर पडता पडता घाईत उद्घाटने का आटोपली जात आहेत. निधी मिळूनही भाजपने किती योजना पूर्ण केल्या ते सांगा, असे चॅलेंज शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने भाजपला दिले आहे.
विकासाची वल्गना करणाऱ्या भाजपने 52 नगरसेवकांसह महापौर, माजी महापौरांसोबत शहराचा काय विकास केला यासंदर्भात खुल्या व्यासपीठावर चर्चेला यावे, असे आमचे आव्हान आहे. मात्र त्यांच्यात ती धमक नाही. तसे धाडस ते करणार नाहीत. कारण तसे केल्यास त्यांचे पितळ उघडे पडेल, असे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी सुनावले आहे.
भाजपने धुळेकरांना संकटात टाकले आहे. त्यांचे जीवन कष्टप्रद केले आहे. सर्व रस्ते उखडले गेले आहेत. कोणतेही काम न करता घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या भाजपला स्वस्थ बसू देणार नाही. या पक्षाच्या नेत्यांनी आधी, शहरात किती निकृष्ट कामे केली? महिनाभरात उखडणारे किती रस्ते दिले? याचा हिशेब जनतेला द्यावा, असे मागणीच अतुल सोनवणे यांनी भाजपच्या महापौरांकडे केली. ठाकरे गटाकडून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले होते. त्यांनी महापौर तसेच प्रशासनावर प्रश्नांची सरबत्तीच केली. कोटींचा निधी मिळूनही गळती रोखण्यासाठी ब्रिटिशकालीन जलवाहिन्या बदलण्याच्या योजनेचे काय झाले? शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बांधकाम झालेल्या नऊ जलकुंभांचा वापर का होत नाही? अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेंतर्गत धुळेकरांना दोन दिवसांआड पाणी मिळणार कधी? असा प्रश्नांचा मारा महापौरांवर करण्यात आला.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातर्फे जिल्हाप्रमुख सोनवणे, किरण जोंधळे, धीरज पाटील, डॉ. सुशील महाजन, प्रफुल्ल पाटील, मच्छिंद्र निकम, संदीप सूर्यवंशी, संदीप चव्हाण, अण्णा फुलपगारे, प्रवीण साळवे, संजय जवराज, भटू गवळी, सुभाष मराठे, कैलास मराठे, कपिल लिंगायत, मुन्ना पठाण, विष्णू जावडेकर, नितीन जडे, गुलाब धोबी, वाल्मीक सोनार, तेजस सपकाळ आदींनी विविध गैरव्यवहारांचे विषय मांडले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.