Chandrakant Khaire On Shirsat-Bhumre : शिरसाट बडबड करतो, भुमरेनी स्वतःचाच विकास केला..

Marathwada : ज्याला कुणाला लोकसभेची उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व एकदिलाने काम करू.
Mla Shirshat-Minister Bhumre- Khaire News
Mla Shirshat-Minister Bhumre- Khaire News Sarkarnama

Shivsena : संजय शिरसाट प्रवक्ता झाल्यापासून खूप बडबड करतो, लोकांना आता त्याचा वीट आला आहे. त्यांच्या बडबडीकडे आम्ही लक्ष देत नाही, तो स्वतःचेच नूकसान करून घेत आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांना सुनावले. (Mla Shirshat-Minister Bhumre- Khaire News) जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मतदारसंघाचा लोकांचा विकास करण्याऐवजी स्वतःचाच विकास करून घेतला, असा टोला देखील खैरे यांनी लगावला.

Mla Shirshat-Minister Bhumre- Khaire News
Tanaji Sawant On Loksabha : धाराशीवची जागा आम्हीच लढवणार; सावंतांच्या दाव्याने राणा पाटलांची कोंडी..

प्रसार माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. (Chandrakant Khaire) खैरे म्हणाले, संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा चेहरा पाहून आता लोकांना कंटाळा आला आहे. तो नुसती बडबड करत असतो, त्याकडे कुणी फारसे लक्षही देत नाही. पण अशाने आपलेच नुकसान होत आहे हे त्याच्या लक्षात येत नाही.

दुसरे आमचे पालकमंत्री त्यांचे ना मतदारसंघाकडे लक्ष आहे ना जिल्ह्याकडे. ते फक्त आपला स्वतःच विकास आणि दारूची दुकाने वाढवण्यात मग्न आहेत. (Shivsena) ज्यांनी शिवसेनेविरुद्ध बंड केले आणि भाजपसोबत गेले, त्या शिंदे गटातच आता बंड होण्याची वेळ आली आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही, लोकसभेच्या जागेवर भाजप दावा सांगतयं, त्यामुळे मिंधे गटासोबत गेलेले सगळे घाबरलेले आहेत.

शहराच्या पाणीप्रश्नावरून भाजपसह, एमआयएम आणि इतर पक्ष आमच्यावर टीका करतात. पण जे आज टीका करतायेत त्यांनीच शहरवासियांसाठी मी मंजूर करून आणलेली संमातर जलवाहिनीची योजना बंद पाडली. भाजप, एमआयएम काही स्वयंसेवी संघटना आणि त्याकाळातले प्रशासनातले मोठे अधिकारी यांनी कमिशन मिळत नाही म्हणून समांतर बंद पाडली, असा आरोप देखील खैरे यांनी केला.

अजूनही लोकांना प्यायला नियमित पाणी मिळत नाहीये. ७९२ कोटींची समांतर घालवल्यानंतर आता २७०० कोटींची नवी योजना आणली पण तिचेही काम रखडले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार तुम्ही असाल का? या प्रश्नावर खैरे म्हणाले, याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व एकदिलाने काम करू, अशी ग्वाही देखील खैरे यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com