Tanaji Sawant On Loksabha : धाराशीवची जागा आम्हीच लढवणार; सावंतांच्या दाव्याने राणा पाटलांची कोंडी..

Shivsena : गेल्या निवडणुकीत आम्ही २३ जागा लढलो, १८ जागा जिंकलो आता या सर्वच २३ जागा आम्ही लढवणार.
Mla Rana jagjeetsingh Patil-Tanaji Sawant News
Mla Rana jagjeetsingh Patil-Tanaji Sawant News Sarkarnama

Dharashiv : शिवसेना राज्यात लोकसभेच्या सर्वच्या २३ जागा लढविणार असल्याचा दावा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे. (Tanaji Sawant On Loksabha) सावंत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. धाराशिवची लोकसभेची जागा शिवसेनाच लढविणार असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.

Mla Rana jagjeetsingh Patil-Tanaji Sawant News
Hingoli Loksabha Constituency News : हिंगोलीच्या जागेवर काॅंग्रेसच्या दाव्याने ठाकरे गटाचे टेन्शन वाढले..

त्यामुळे आता भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjeetsingh Patil) यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता त्याचे काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. डॉ. सावंत (Tanaji Sawant) यांच्या दाव्याने पुन्हा एकदा भाजप-सेना यांच्यातील जागावाटपाचा सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे.

आघाडीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून जागा वाटपाच्या मुद्द्यावर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. आता भाजप-सेना युतीमध्येही हा सुप्त संघर्ष सुरू झाल्याचे सावंत यांच्या दाव्याने स्पष्ट झाले आहे. (Osmanabad) तानाजी सावंत यांनी सोमवारी (ता. पाच) धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालायत झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या जागा वाटपाच्या मुद्दयावर मत व्यक्त करत खळबळ उडवून दिली.

गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही २३ जागा लढलो, त्यापैकी १८ जागा जिंकलो आता या सर्वच २३ जागा आम्ही लढवणार आहोत. शिवाय धाराशिवची जागा गेल्या २५ वर्षांपासून आमच्याकडे आहे. त्यावर आमचाच दावा असल्याचे सांगत सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या दाव्यातील हवा काढून टाकली. गेल्या आठवड्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघावर राणापाटील यांनी दावा केला होता.

धाराशिव लोकसभेच्या अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील तीन जागा भाजपच्या तर दोन जागा शिवसेनेच्या (शिंदे गट) ताब्यात आहेत. सावंत यांनी २५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दिचा दाखला दिला आहे. तर दुसरीकडे सध्याची स्थिती बघता भाजपची राजकीय ताकद जास्त असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दोघांमधील राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली असली तरी स्वतःचे बळ तपासून दावे-प्रतिदावे होणार की संघर्ष शिगेला पोहचणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com