Chandrashekhar Bawankule News : 'मिशन मराठवाडा' 5 महापालिकांच्या युतीचा तिढा सोडवण्यासाठी बावनकुळे मैदानात; मोठ्या निर्णयाची शक्यता!

Chandrashekar Bawankule latest news : मिशन मराठवाडाअंतर्गत 5 महापालिकांच्या युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरले असून लवकरचं मोठ्या निर्णयाची शक्यता आहे.
BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominance
Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena BJP News : मराठवाड्यातील पाच महापालिकांमध्ये महायुती करण्यासाठी नेमलेल्या स्थानिक समन्वय समितीला अद्याप यश आलेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत चार दिवस शिल्लक आहे. अजूनही कोणी किती जागा, कुठल्या जागा लढवायच्या याचा फैसला झालेला नाही. उलट शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये युतीवरून तानातानी सुरू आहे. यावर आता अंतिम निर्णय घेण्यासाठी भाजपचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे आज किंवा उद्या युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि लातूर या पाच महापालिका निवडणुकीत युतीसाठी गेल्या दोन आठवड्यापासून शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये कथ्याकूट सुरू आहे. दोन्ही पक्षांच्या मोजक्या सदस्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीतील सदस्यांमध्ये चर्चेच्या तीन-चार फेऱ्या झाल्या, मात्र जागा वाटपांवर एकमत होऊ शकलेले नाही. युतीचा निर्णय लांबत चालल्याने महायुतीतील शिवसेना-भाजप या दोन पक्षातील इच्छुकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे.

BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominance
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंनी चक्क 39 एकर जमीन फुकट वाटली! कुठे जमीन बळकावणारा अन् कुठे..." भाजप पदाधिकाऱ्याचा अब्दुल सत्तारांवर निशाणा!

एकतर बाहरेच्या पक्षातून आलेल्यांना थेट उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने मुळ भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि खदखद मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यातून मोठा स्फोट किंवा बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे युतीचा निर्णय लवकर घेऊन चित्र स्पष्ट करणे आणि दोन्ही बाजूच्या इच्छूक उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे गरजेचे बनले आहे.

जालन्यात शिवसेना- भाजप युतीच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद आहेत. शिवसेनेने तर युतीचा नाद सोडत शहर विकास आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, भागवत कराड, भास्कर दानवे आदींची संभाजीनगरमध्ये आढावा बैठक पार पडली. आज सायंकाळी किंवा उद्या जालन्यातील युतीवर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी शक्यता आहे.

BJP stronghold in Kamthi, highlighting Chandrashekhar Bawankule’s political dominance
New Rules 1 January 2026 : नवीन वर्षात बँकिंग ते LPG पर्यंत मोठे बदल; काय महागणार अन् काय होणार स्वस्त?

संभाजीनगरात आणखी एक समिती..

इकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही वेगळी परिस्थिती नाही. आता पर्यंत चर्चेच्या पाच बैठका झाल्या मात्र यातून समाधानकारक तोडगा निघालेला नाही. आता भाजपने दोन्ही पक्षांची मिळून एक समन्वय समिती नेमली आहे. त्यात भाजपकडून अतुल सावे, भागवत कराड, संजय केनेकर, किशोर शितोळे, समीर राजूरकर तर शिवसेनेकडून संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल, राजेंद्र जंजाळ आणि ऋषीकेश जैस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समितीच युतीचा अंतिम निर्णय घेणार आहे.

तत्पुर्वी चंद्रशेखर बावनकुळे हे संभाजीनगरमध्ये भाजपच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहे. तसेच परभणी, लातूर आणि नांदेडचा आढावा देखील बावनकुळे हे आज किंवा उद्या घेणार आहे. त्यानंतर कदाचित पाचही महापालिकेतील युतीची घोषणा एकाच दिवशी केली जाण्याची शक्यता आहे. परभणी, नांदेड, लातूरमध्ये युतीसाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com