100 हून अधिक नगरसेवक बिनविरोध! मनसे कोर्टात, भाजप निर्धास्त? विरोधकांना खोचक टोला देत बावनकुळेंचं मोठं वक्तव्य

Chandrashekhar Bawankule On Municipal Elections : नुकताच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर आता हाच ट्रेंड महापालिका निवडणुकीतही दिसत आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankulesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • महापालिका निवडणुकीत भाजप व इतर पक्षांचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

  • या बिनविरोध निवडींवर विरोधकांनी आक्षेप घेत कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली आहे.

  • भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बिनविरोध निवड लोकशाहीसाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

BJP Political News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. महापालिका निवडणुकीतही तोच ट्रेंड समोर येत आहे. आतापर्यंत भाजपचे व इतर पक्षांचे मिळून शंभरहून अधिक नगसेवक बिनविरोध झाले आहेत. यावरून आता विरोधकांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपचे मंत्री व राज्याचे निवडणुक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बिनविरोध निवड हे लोकशाहीत चांगले असल्याचे म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांनी जो गदारोळ सुरू केला आहे. तो चुकीचा आहे. लोकशाहीत बिनविरोध निवड होणे ही चांगली गोष्ट आहे. निवडणुक आयोगाची त्याला मान्यता आहे. नियम डावलून कुठे हे होतयं असं नाही. त्यामुळे कोणाला कोर्टात जायचं आणखी कुठं जायचं तिथ जाऊ द्या, अशा शब्दात त्यांनी बिनविरोध निवडीचे समर्थन केले.

महानगर पालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून झालेल्या वादानंतर भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल केले. बंडखोरांना घरी जाऊन, हात जोडून माघार घ्यायला लावण्यातही स्थानिक नेत्यांना यश आले. आता प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत या नाराजांचा कुठलाही फटका बसू नये यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करणात आहेत.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule News : 'मिशन मराठवाडा' 5 महापालिकांच्या युतीचा तिढा सोडवण्यासाठी बावनकुळे मैदानात; मोठ्या निर्णयाची शक्यता!

शहरात दाखल होताच माध्यमांनी बावनकुळे यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली. यात प्रामुख्याने बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु बावनकुळे यांनी कोणाची बिनविरोध निवड होणे यात काहीच वावगे नसल्याचे म्हटले आहे. लोकशाहीत एखादा उमेदवार कुठल्याही विरोधीशिवाय बिनविरोध निवडून येत असेल तर त्यात चुकीचे काही नाही. लोकशाहीसाठी हे चांगले चित्र आहे. राज्य-केंद्र सरकारच्या कामावर खूष होऊन जर अशा प्रकारे कोणी बिनविरोध निवडून येत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.

केंद्र आणि राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी, विकासकामे होत असल्यामुळे लोकांचा विश्वास वाढला आहे. यातूनच अनेक ठिकाणी आमच्या पक्षाचे आणि महायुतीचेही नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत. विरोधकांनी यावर टीका करणे योग्य नाही. निवडणुक आयोगाची याला मान्यता आहे. ही बिनविरोध निवड कुठेही नियमबाह्य ठरत नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला कोर्टात जायचे त्यांनी खुशाल जावे, तिथेही त्यांच्या हाती काही लागणार नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

प्रणिती शिंदे आमच्या संपर्कात नाही...

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार आहेत, असा आरोप केला होता. यावर बावनकुळे यांना विचारले तेव्हा, अशी कुठल्याही प्रकारची चर्चा प्रणिती शिंदे यांची आमच्यासोबत झालेली नाही. त्या काँग्रेस पक्षाचं काम करत आहेत. त्यांच्याबातीत काही चुकीचे बोलून मी त्यांचे राजकीय करिअर संकटात आणू इच्छित नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंनी काढला कामठीचा वचपा! रामटेकला युतीने केले काँग्रेसमुक्त

FAQs :

Q1. महापालिका निवडणुकीत किती नगरसेवक बिनविरोध झाले आहेत?
➡️ आतापर्यंत 100 पेक्षा अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

Q2. बिनविरोध निवडींवर वाद का निर्माण झाला आहे?
➡️ विरोधकांच्या मते या प्रक्रियेमुळे लोकशाहीला बाधा येत आहे.

Q3. विरोधक काय पाऊल उचलणार आहेत?
➡️ विरोधकांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

Q4. चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका काय आहे?
➡️ त्यांनी बिनविरोध निवड लोकशाहीत चांगली असल्याचे म्हटले आहे.

Q5. हा ट्रेंड आधी कुठे दिसून आला होता?
➡️ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्येही असाच ट्रेंड पाहायला मिळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com