

Nagpur politics : नागपूर जिल्ह्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसला. काहींचे बालेकिल्ले उध्वस्त झाले. राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी शहराने कधीच मताधिक्य दिले नाही. मात्र यावेळी त्यांनी इतिहास घडवला. कामठी नगर पालिकेच्या स्थापनेच्या तब्बल 40 वर्षानंतर भाजपचा नगराध्यक्ष येथून निवडून आणला. दुसरीकडे शेजारीच असलेल्या रामटेक विधानसभा मतदारसंघाला भाजप व शिंदे सेनेने एकत्रित येऊन काँग्रेसमुक्त केले.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी बावनकुळे यांनी वचपा घेतला असा प्रतिक्रिया व्यक्त केली. यवरून भाजपने कामठी शहराची निवडणूक किती गंभीर घेतली होती हे दिसून येते. सोबतच सावनेर शहरावर आपला हक्क सांगणाऱ्या केदारांचा बिमोड करणाऱ्या आमदार आशिष देशमुख यांचेही कौतुक केले आहे.
कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे सातत्याने निवडून येत आहे. मात्र कामठी शहरातून त्यांना आजवर मताधिक्य घेता आले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत कामठीने काँग्रेसला सुमारे 18 हजाराचे मताधिक्य दिले होते. कामठी शहराचा इतिहास मतदारांचा समाज बघता भाजपला येथे राज्य करण्याची संधी कधीच मिळणार नाही असेच सर्वांना वाटत होते.
या मतदारसंघची बारिकसारिक माहिती असल्याने भाजपने वेगळेच नियोजन केले होते. शेवटपर्यंत कोणाला शंका आली नाही. सुलेखा कुंभारे यांनी भाजपसोबत युती तोडली. त्यांनी आपले उमेदवार उभे केले. दोन मुस्लिम समाजाचे उमेदवार येथून उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसमधून फोडून शाजाभाई यांच्या हातात घड्याळ दिले.
असे करून काँग्रेसचे (Congress) उमेदवार शकूर नागनी यांचे मतांचे पद्धतशीर विभाजन केले. अतिशय चुरशीचा आणि अटीतटीचा सामना येथे रंगला. शेवटच्या फेरीपर्यंत कोण जिंकेल याचा थांगपत्ता कोणाला लागत नव्हता. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. शेवटी एकदाचे भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल अवघ्या 180 मतांनी निवडून आले.
सोमवारी नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी येथे नागपूर जिल्ह्यातील विजयी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत कामठी शहरात भाजपला कमी मिळाली होती. मात्र आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांचा वचपा काढला आहे. रामटेक, उमरेड आणि भिवापूर येथील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले असून त्यामुळे ही तीनही शहरे काँग्रेसमुक्त झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.