Imtiaz Jaleel Meet Manoj Jarange : आजारी जरांगे पाटलांची इम्तियाज जलील यांनी घेतली भेट

Loksabha Election : अशक्तपणामुळे थकवा आलेल्या जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच आज (शनिवार) इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Imtiaz Jaleel Meet Manoj Jarange
Imtiaz Jaleel Meet Manoj Jarange sarkarnama

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार न देता ज्यांनी आपल्याला साथ दिली नाही त्यांना पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी मराठा समाजाला केले होते. मराठवाड्यात मतदान शुक्रवारी (ता.26) पार पडले. नांदेड, हिंगोली, परभणी या तीन लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले. या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावी ठरल्याचे मतदानानंतरच्या चर्चेतून समोर येत आहे. जरांगे पाटील हे संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार घेत आहेत. ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळताच संभाजीनगरचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी जरांगे यांची भेट घेतली.

Imtiaz Jaleel Meet Manoj Jarange
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

अशक्तपणामुळे थकवा आलेल्या जरांगे पाटील यांच्यावर संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याची माहिती मिळताच आज (शनिवार) इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची समजली जाते.

इम्तियाज जलील Imtiaz Jaleel यांनी मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले तेव्हा इम्तियाज यांनी त्यांची भेट घेतली होती. आमचा मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळत असेल, तर लहान भाऊ म्हणून मुस्लिम समाज आरक्षणासाठी आणखी वाट पाहण्यास तयार असल्याची भूमिका इम्तियाज यांनी अंतरवाली सराटी येथील व्यासपीठावरून जाहीर केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील यांचे अनेकदा इम्तियाज जलील व त्यांचे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जाहीरपणे कौतुक करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका राज्यात महत्त्वाची ठरत आहे. मराठा समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने फसवल्याची भावना आहे. याचे पडसाद निवडणूक प्रचारादरम्यान उमटल्याचे दिसले.

नांदेड, हिंगोली, परभणी या पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या तीनही मतदारसंघांत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. शिवाय जरांगे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाजाच्या मतदारांनी वेगळी आणि निर्णयक भूमिका मतदान करताना घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांना याचा फटका बसून काही अनपेक्षित व आश्चर्यकारक निकाल समोर येऊ शकतात.

संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील सध्या अडचणीत असल्याचे चित्र आहे. स्वबळावर लढणाऱ्या एमआयएमला कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा आहे. थेट पाठिंबा मिळाला नाही, तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून समाजामध्ये असलेली चीड मतांमधून व्यक्त झाली आणि ती आपल्या पथ्यावर पडली तर दुसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, अशी इम्तियाज अपेक्षा बाळगून आहेत. जरांगे पाटील यांची घेतलेली भेट हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.

(Edited By Roshan More)

R

Imtiaz Jaleel Meet Manoj Jarange
Loksabha Election 2024 : मोठी बातमी! वर्षा गायकवाडांविरोधातला भाजपचा चेहरा ठरला; उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com