Imtiaz Jaleel News : नुसता पाठिंबा नाही, आनंदराज आंबेडकरांसाठी अमरावतीत सभा घेणार...

Anandraj Ambedkar 'एमआयएम'ने अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Imtiaz Jaleel, Anandraj Ambedkar
Imtiaz Jaleel, Anandraj Ambedkarsarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचा आश्चर्यकारक निर्णय एमआयएमने घेतला. छत्रपती संभाजीनगगर दौऱ्यावर असलेले असदुद्दीन ओवेसी, खासदार तथा महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दोन्ही आंबेडकर बंधूंना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला.

केवळ पाठिंबा जाहीर करून एमआयएम थांबणार नाही, तर स्वतः खासदार इम्तियाज जलील उद्या (ता.23) रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. 'एमआयएम'ने अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितने न मागता पाठिंबा देण्याची एमआयएमची ही राजकीय खेळी त्यांना संभाजीनगरात वंचित समाजाची मते मिळवून देण्यात यशस्वी ठरते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या महिन्यात आनंदराज आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांची त्यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट झाली होती. या दोन्ही नेत्यांनी सोबत स्नेह भोजन करत अमरावती लोकसभा मतदारसंघाबद्दल चर्चा केली होती. भाजपने उमेदवारी दिलेल्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी एका कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर तोफ डागली होती.

Imtiaz Jaleel, Anandraj Ambedkar
Chhatrapati sambhaji nagar Constituency: छत्रपती संभाजीनगरात तिरंगी लढत ; महायुती- आघाडी- एमआयएम भिडणार!

हिंमत असेल तर अमरावतीत येऊन लढा, असे आव्हान राणा यांनी एमआयएमला दिले होते. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्या घरी झालेल्या आनंदराज आंबेडकर यांची भेट झाली होती. या वेळी दोघांनी सोबत भोजन घेत राजकीय विषयावर चर्चा केली. त्यानंतरच अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा देण्याचे निश्चित केले होते. याची अधिकृत घोषणा ओवेसी यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडच्या जाहीर सभेत केली होती.

केवळ आनंदराजच नाही, तर प्रकाश आंबेडकर आणि कोल्हापूरचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनाही पाठिंबा जाहीर केला. एमआयएमने या न मागता देऊ केलेल्या पाठिंब्याची राज्यभरात चर्चा आहे. पण एमआयएमने दिलेला पाठिंबा हा केवळ दिखावा नाही, तर मनापासून दिला आहे, हे दाखवण्यासाठी स्वतः इम्तियाज जलील अमरावतील उद्या आनंदराज आंबेडकर यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Imtiaz Jaleel, Anandraj Ambedkar
Mp Imtiaz Jalil : इम्तियाज जलील यांनी 'वंचित'बाबत केलेली 'ती' मागणी ओवेसींनी एका झटक्यात मान्य केली

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत असलेले इम्तियाज जलील वंचितची साथ नसल्यामुळे अडचणीत असल्याचे बोलले जाते. परंतु या पाठिंबा जाहीर करण्याच्या निर्णयातून दलित मतांना साद घालण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा आणि त्यांच्यासाठी सभा घेणारे इम्तियाज जलील अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा प्रचार करणार का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Imtiaz Jaleel, Anandraj Ambedkar
Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगर मे कमल नहीं खिलेगा; बाण लक्ष्य भेदणार की मशाल पेटणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com