Marathwada Political : महायुतीचे ठरले, मराठवाड्यात 'असे' होणार जागावाटप

Loksabha Election : आठपैकी किती जागा लढायच्या यावर झाले शिक्कामोर्तब ?
Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांचे जागावाटप अंतिम झाले असल्याची माहिती आहे. मिशन 45 चे टार्गेट घेऊन मैदानात उतरणाऱ्या भाजपाने घटकपक्षांचेही पूर्ण समाधान केल्याचे समजते. मराठवाड्याचा विचार केला असता आठ लोकसभा मतदारसंघातून कोणता पक्ष किती जागा लढवणार, यावरही शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाबाबत मात्र शिवसेना (Shivsena) आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघाचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशीही माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तीनही पक्षांकडून मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे सांगितले जात होते. एवढेच नाही, तर महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढतील, अशाही चर्चा होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Ambadas Danve News : ये डर अच्छा है.. अंबादास दानवे असे का म्हणाले ?

परंतु या सर्वांना महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी पूर्णविराम दिल्याचे समजते. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपा चार व शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी दोन लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदे गट मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli) आणि धाराशिव मतदारसंघातून लढणार आहे, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला बीड आणि परभणी हे दोन मतदारसंघ आले आहेत.

लातूर (Latur), नांदेड, जालना मतदारसंघ भाजप लढवणार असून याशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या चौथ्या जागेवरही भाजपने दावा सांगितला आहे. परंतु ही जागा पूर्वीपासून शिवसेनेकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीगरसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजपाकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी या मतदासंघातून वर्षभरापासून जोरदार तयारी केली आहे. शिवाय मराठवाड्याच्या राजधानीत आपला खासदार असावा, असा भाजपाच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांचाही आग्रह आहे.

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Hingoli Lok Sabha : हिंगोलीतून हेमंत पाटीलच फिक्स, आमदार बांगरांनी गुलाबही उधळले...

आतापर्यंत युतीमध्ये भाजपला संभाजीनगरमध्ये लढता आले नव्हते. आता संधी असल्यामुळे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीत इथे शिवसेनेचा पराभव झालेला असल्यामुळे भाजप संभाजीगरसाठी आग्रही आहे. त्यामुळे या जागेबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच हा तिढा सोडविण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकत्रितपणे बसून निर्णय घेतील, असे बोलले जाते. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरे, संजय शिरसाट लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत.

(Edited By - Chaitanya Machale)

R...

Ajit Pawar, Devendra Fadanvis, Eknath shinde
Shivsena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर झिरवाळांचं भन्नाट उत्तर; ‘अरं बाबा...ऽऽ त्याचा माझा काय संबंध?’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com