
Imtiaz Jaleel on BJP behaviour : 'AIMIM'चे महाराष्ट्रातील नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी 'सकाळ माध्यम समूहा'च्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना, सध्याच्या राजकीय विचारसरणीवर भाष्य केले.
'लोकसभेतील खासदार म्हणजे, कायदे तयार करणारी माणसं. त्यामुळे आम्हाला सर्वच गोष्टींचं भान असायला हवं. पण केंद्रातील मोदी सरकारच्या खासदारांच्या विचारसरणीत ते दिसत नाही, हे सांगताना वरपासून ते खालपर्यंत यांची विचारसरणी गंदी आहे', असा घणाघात इम्तियाज जलील यांनी केला.
लोकसभेच्या कामकाजाच्या अनुभवावर बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, "'AIMIM'चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी लोकसभेत बोलायला उभे राहिली की, भाजपचा खासदार कमेंट करतो. काही कारण नसताना हसतात. मुस्लिमांबाबत भाजपचे खासदार लोकसभा सभागृहात विधानं करतात. तशी ती गंभीर असतात. लोकसभा अध्यक्ष प्रामाणिक असते, तर त्याचवेळी त्यांना निलंबित करायला पाहिजे होते. पण त्यावेळी ते देखील हसतात. सर्वच हसतात. हे गंभीर आहे".
मुस्लिमांविषयीच (Muslim) नाही, सर्वच समाजाचे देशाचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभा सर्वात उच्च सभागृह आहे. असे असताना, तिथं वैचारिक मंथन व्हायला पाहिजे. देशाला वळण लावण्यासाठी कायदे तयार करणारे मोठं सभागृह आहे. पण तिथं वैचारिक बैठक होत नसले, त्याऐवजी खालच्या पातळीवर टीका होत असेल, अन् कायदेमंत्री त्यात सहभागी होत असेल, तर देश कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज येतो, असे सांगताना इम्तियाज जलील यांनी मोदी सरकारच्या काळातील लोकसभेतील कामकाजावर हल्लाबोल चढवला.
'लोकसभेत असदुद्दीन ओवैसी बोलत होते. कायदेशीर रविप्रसाद शंकर असतानाचा हा प्रकार आहे. भिदूरी नावाच्या खासदार शिव्या देत होता. पण रविशंकर प्रसाद यांनी त्यांना शांत बसवलं नाही. उलट ते हसत होते. यातून स्पष्ट होते की, वरपासून ते खालपर्यंत, यांची विचारसरणी गंदी आहे. म्हणजे त्यांना वाटत होतं की, अशा शिव्या देऊन ते ‘स्टार’ बनतात. हीच त्यांची संस्कृती आहे का?', असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.
'वैचारिक मतभेद असू शकतात, ते नक्कीच राहणार. मतभेद असतील, राजकीय भिन्नता असेल. पण माणुसकी आणि सुसंस्कृतपणाची एकरेषा ओलांडून वागणं योग्य नाही. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा एकच व्यासपीठं एकत्र शेअर करायचे. पण त्यांनी कधीही खालच्या पातळीवरची भाषा वापरली नाही', याची आठवण इम्तियाज जलील यांनी करून दिली.
काँग्रेसचेही खासदार संसदेत होते, पण त्यांनी अशा भाषेचा कधी वापर केला नाही. माझं मत हे कोणत्याही पक्षाबद्दल असो, काँग्रेस, भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा लालूप्रसाद यादव हे सगळे एकाच साच्यातले आहेत. हिंदीत म्हणतात ना, "एक ही थाली के चट्टे-बट्टे"! एकाकडे धर्मनिरपेक्षतेचा बुरखा आहे, दुसऱ्याकडे उघड कम्युनल अजेंडा. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते, विशेषतः अल्पसंख्याकांच्या संदर्भात, तेव्हा सगळ्यांची भूमिका सारखीच असते, 'दुय्यम आणि उपेक्षित', असे गंभीर आरोप सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यपद्धतीवर इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.