Shivsena News : तिकीट कापल्यानं महिला महानगरप्रमुख ढसाढसा रडल्या; तर राजेंद्र जंजाळ समर्थकांकडून युती तोडण्याची भाषा!

Chhatrapati Sambhajinagar Shivsena: शिवसेना-भाजपची युती लांबल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजीनाट्य आता वेगळेचं रुप धारण करत आहे. शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख शारदा घुले या प्रभाग क्रमांक आठमधून इच्छूक होत्या. पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला.
Chhatrapati Sambhajinagar Shivsena.jpg
Chhatrapati Sambhajinagar Shivsena.jpgSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : शिवसेना-भाजपची युती लांबल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजीनाट्य आता वेगळेचं रुप धारण करत आहे. शिवसेनेच्या महिला महानगरप्रमुख शारदा घुले या प्रभाग क्रमांक आठमधून इच्छूक होत्या. पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला. पण सोमवारी (ता.29) अचानक त्यांना उमेदवारी कापल्याचं समजलं. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात राडा घातला. एकनाथ शिंदेसाहेब (Eknath Shinde) लाडकी बहीण म्हणतात, मग एका लाडक्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही का? पैसे घेऊन तिकीटं विकण्यात आली, असा गंभीर आरोप घुले यांनी केला.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही म्हणत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत पक्षाचे संपर्क कार्यालय सोडले. त्यानंतर जंजाळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली असून भाजपसोबतची युती तोडा, अशा घोषणा दिल्या जात आहे.

यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेतील (Shivsena) वातावरण चांगलेच तापले आहे. महानगरप्रमुख शारदा घुले यांनी तब्बल तीन ते चार तास पक्ष कार्यालयात ठाण मांडत मला न्याय द्या, अशी मागणी लावून धरली.

माझे काही बरेवाईट झाले, तर हे कार्यालय जाळून टाका, मला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो, याला हे नेते जबाबदार असतील, असा इशारा देत आपल्या समर्थकांसह प्रचार कार्यालय दणाणून सोडले आहे. आता त्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी जाऊन न्याय मागणार असल्याची माहिती आहे.

Chhatrapati Sambhajinagar Shivsena.jpg
Sambhaji Bhide News : भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भिडे गुरुजींना मोठा झटका; नाराज 'शिवप्रतिष्ठान'ची तडकाफडकी मोठी घोषणा

सध्या शिरसाट यांच्या बंगल्यावर युतीसंदर्भात भाजप नेत्यांसोबत अंतिम बैठक सुरू आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. आपल्याला या बैठकीचा निरोप, माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले

दुसरीकडे जंजाळ समर्थकांनी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनात घोषणा आणि युती तोडा अशी मागणी करत हे समर्थक आक्रमक झाले आहेत. युतीचे काय होणार? या पेक्षा आता शिवसेनेत उडालेल्या या वादाच्या भडक्यावर नेते काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar Shivsena.jpg
Pune BJP : ज्याची भीती,तेच घडलं, पहिली यादी जाहीर होताच पुणे भाजपला पाठोपाठ दोन मोठे धक्के; 'या' नेत्यांनी घेतलं घड्याळ हाती

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे हे जंजाळ यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या कार्यालावर पोहचले आहेत. त्यांच्यासमोरच युती तोडा, युती तोडा अशा घोषणा देण्यात आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com