Chhatrapati Sambhajinagar Breaking : रिश्वत मत लेना,गब्बर आ जायेगा..! नेते,पोलिस अधिकाऱ्यांच्या हत्याकांडाची धमकी

Chhatrapati Sambhajinagar Crime News : बिडकीन पोलिस ठाण्यात काही वर्षांत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांमुळे हप्तेखोरी वाढली. तसेच येथील 22 जणांचा उल्लेख केला असून, यांची परिसरात दहशत पसरली आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama

विजय देऊळगावकर-

Chhatrapati Sambhajinagar News : पोलिस महासंचालक कार्यालयाच्या नावाने निनावी पाठवण्यात आलेल्या एका पत्राने सोशल मीडियावर खळबळ माजली. ‘गब्बर’ असे टोपण नाव लिहिलेल्या या व्यक्तीने बिडकीन पोलिस ठाण्यात अराजकता माजली असल्याचा खळबळजनक आरोप केला. ही अराजकता न थांबल्यास राजकीय नेत्यांसह पोलिस अधिकाऱ्यांचे हत्याकांड करणार असल्याची धमकी या पत्रात दिली.

या प्रकरणी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया म्हणाले, ‘‘हा प्रकार आता आपल्या समोर आला. याबाबत अधिकृत पत्र महासंचालक कार्यालयाकडून आल्यानंतर चौकशी करू,’’ असे त्यांनी सांगितले.

पोलिस महासंचालक कार्यालयाला टपालाने पाठवलेल्या या पत्रावर 17 जानेवारी 2024 चा शिक्का आहे. पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा अर्जदार म्हणून ‘कायदा आणि सुव्यवस्थेला कंटाळलेला गब्बर’ असा उल्लेख केला.

या पत्राचा आशय पुढीलप्रमाणे

अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी आहे. बिडकीन पोलिस ठाण्यात काही वर्षांत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांमुळे हप्तेखोरी वाढली. तसेच येथील 22 जणांचा उल्लेख केला असून, यांची परिसरात दहशत पसरली आहे.

ही मंडळी राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. गोरगरिबांवर अत्याचार सुरू असून, हा प्रकार थांबला नाही. तसेच प्रामाणिक अधिकारी या भागात बसवले नाही तर मोठे हत्याकांड घडवून आणू आणि या हत्याकांडाची सुरुवात पोलिस (Police) अधिकाऱ्यांपासून करू. यानंतर जिल्ह्यात कोठेही अत्याचार झाल्यास आणि आरोपी राजकीय नेत्यांचे समर्थक असतील, त्यांना जर नेतेमंडळींनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर आमची गँग अशा नेत्यांना ठार मारेल. आमच्या 100 जणांची टोळी आहे. काही झाल्यास गँग बदला घेणार आहे, असा आशय या पत्राचा आहे.

Crime News
Sandipan Bhumre Meet Manoj Jarange : संदीपान भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट; पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर झाली काही मिनिटांची चर्चा!

पत्राखाली सूचना लिहिताना ते लिहिणाऱ्याने त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेते मंडळींची असून, त्याला काही झाल्यास नेते मंडळींना ठार मारण्याची धमकी पुन्हा एकदा पत्रात दिली. शिवाय यानंतर बिडकीनच्या गावगुंडाचा कुठल्याही केसमध्ये हस्तक्षेप झाला नाही पाहिजे, तसेच पत्रात नाव घेतलेल्या राजकीय गुंडांनी कायद्याच्या चौकटीत राहावे; अन्यथा त्यांचा शरद मोहोळ किंवा गजू तौर करू अशी धमकी दिली आहे.

चित्रपटाची आठवण...

अभिनेता अक्षयकुमार याचा ‘गब्बर’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या नायक करतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. या पत्रातील व्यक्तीने देखील स्वतः गब्बर असल्याचा उल्लेख करीत ‘रिश्वत मत लेना गब्बर आ जायेगा’ अशी टीप पत्रात लिहिली आहे. त्यामुळे या चित्रपटाची आठवण झाली आहे.

हा प्रकार आताच आमच्यासमोर आला. पत्रात उल्लेख केलेले पोलिस अधिकारी संतोष माने, गणेश सुरवसे यांची बदली पूर्वीच दुसऱ्या जिल्ह्यात झाली आहे. हे पत्र अधिकृत आम्हाला भेटल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

- मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण

Crime News
Atul Save in Action : लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात विरोधकाला लीड; मंत्री अतुल सावे 'अलर्ट' मोडवर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com