Harshvardhan Jadhav News : हर्षवर्धन जाधव निवडणुकीनंतर आईला घेऊन काश्मीर सहलीवर...

Harshvardhan Jadhav News: 2019 मध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्याचा मोठा फायदा जाधव यांना समाजाची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी झाला होता. गेल्या निवडणुकीतील वातावरणात प्रमुख पक्षांच्या उमेदवारापेक्षा सर्वाधिक चर्चा ही जाधव यांची झाली होती.
Harshvardhan Jadhav
Harshvardhan JadhavSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) संभाजीनगरमध्ये 13 मे रोजी मतदान पार पडले. आता निकालासाठी 4 जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे या मधल्या काळात जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार हे कोणी देवदर्शनाला, तर कोणी आपापल्या युती-आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेरच्या मतदारसंघात निघून गेले होते. तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) हे आपल्या आईला सोबत घेऊन थेट काश्मीर सहलीवर गेले आहेत.

आपल्या सोशल मिडिया पेजवर जाधव यांनी आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. शेवटपर्यंत आईची साथ सोडणार नाही, हे जाधव यांनी प्रत्यक्षातही दाखवून दिले असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या या फोटवर नेटकरी देताना दिसत आहेत. हर्षवर्धन जाधव हे मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींवर मात करून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्याचा मोठा फायदा जाधव (Harshvardhan Jadhav) यांना समाजाची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी झाला होता. गेल्या निवडणुकीतील वातावरणात प्रमुख पक्षांच्या उमेदवारापेक्षा सर्वाधिक चर्चा ही जाधव यांची झाली होती. शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) युती- एमआयएम (MIM) या दोन पक्षांच्या थेट लढतीत हर्षवर्धन जाधव यांनी उडी घेत संभाजीनगर लोकसभेचा (Sambhajinagar Lok Sabha) निकाल फिरवला होता.

जाधव यांनी या निवडणुकीत 2 लाख 83 हजार एवढी मते मिळवत सगळ्या प्रस्थापित पक्षांना हादरा दिला होता. ते निवडून आले नाहीत, पण त्यांनी पाडण्याची जबाबदारी पार पाडली होती. यावेळी जाधव मैदानात होते, पण त्यांची फारशी चर्चा झाली नाही. कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्या काहीसा प्रभाव जाणवल्याचे मतदानाच्या टक्केवारी नंतर बोलले जात आहे. तर दुसरीकडे जाधव यांनी मात्र आपल्याला दोन लाखाहून अधिक मते मिळाल्याचा दावा केला होता. अर्थात तो किती खरा किती खोटा हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. परंतु आईसोबत काश्मिर सहलीवर गेलेले हर्षवर्धन जाधव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Harshvardhan Jadhav
Sharad Pawar Vs Anna Hazare : अण्णा हजारे आता आहेत कुठे? शरद पवार, असे का म्हणाले...?

आई खंबीरपणे पाठीशी उभी असते

वैयक्तिक आयुष्यात कितीही संकट आली तरी आई खंबीरपणे पाठीशी उभी असते याची प्रचिती या सहलीतील फोटोवर नजर टाकल्यावर निश्चित येते. निवडणूक निकाल काही लागो, पण मतदानानंतर आईला काश्मिरची सहल घडवून आणणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच होताना दिसतं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com