Sharad Pawar Vs Anna Hazare : अण्णा हजारे आता आहेत कुठे? शरद पवार, असे का म्हणाले...?

Sharad Pawar News : राज्यातील अनेक सहकारी कारखाने बेकायदेशीरपणे विकून यात राज्य सरकारचा 25 हजार कोटींचा महसूल बुडला. या घोटाळ्यामागे शरद पवार आणि अजित पवार असल्याचा आरोप अण्णा हजारेंनी केला होता.
Anna Hazare-Sharad Pawar
Anna Hazare-Sharad PawarSarkarnama

Lok Sabha Election 2024 : 'माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचे दावे केले गेले. प्रचंड आरोप केले. चौकश्या झाल्या. आरोप करत असलेल्यांच्या पुराव्यांमध्ये पुढे काहीच तथ्य निघाले नाही. आरोप करणारे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार आणि अण्णा हजारे आहेत कुठे?', असा सवाल शरद पवार यांनी केला.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जनआंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना डिवचले. शरद पवार आणि अण्णा हजारे यांच्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून नेहमीच संघर्ष राहिला आहे. अण्णा हजारे यांनी अनेकदा शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकश्यांची मागणी केली. न्यायालयात धाव घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anna Hazare-Sharad Pawar
Solapur Crime : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, दोन माजी नगरसेवकांसह 17 जणांवर जुगारप्रकरणी गुन्हा; 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यातील अनेक सहकारी कारखाने बेकायदेशीरपणे विकून त्यात कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा, त्यातील एक आरोप. या घोटाळ्यामागे शरद पवार आणि अजित पवार आहेत. यातून राज्य सरकारच्या 25 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडल्याचा दावा अण्णा हजारेंनी केला होता. यावर अण्णा हजारेंनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अण्णांच्या मागणीनुसार केलेल्या चौकश्या झाल्या. परंतु पुढे यात तथ्य निघाल्याचे दिसले नाही.

शरद पवारांवर आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी आक्रमक झाली होती. त्यावेळी नवाब मलिक राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते. त्यांनी अण्णा हजारे यांना आरएसएसचे एजंट म्हटले होते. शरद पवार यांची बदनामी करण्याच्या कटात 'आरएसएस'मध्ये सहभागी झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी त्यावेळी केला होता. भाजप सरकारच्या काळात अण्णा हजारेंनी एकही आंदोलन केले नसल्याकडे राष्ट्रवादीचे नेते लक्ष वेधतात. पुढे सहकारी कारखान्यांच्या बेकायदेशीर विक्री घोटाळ्यात शरद पवारांचे नाव नसल्याचे निप्षन्न झाले.

Anna Hazare-Sharad Pawar
Adhir Ranjan Chowdhury : ममता बॅनर्जींशी लढायचं असेल तर आमच्याकडे या; काँग्रेसच्या चौधरींना भाजपची ऑफर!

अण्णांनी 2012 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी आंदोलन केले होते. काँग्रेस सत्ताधारी यांच्याविरोधात जनसामान्यांमध्ये भ्रष्टाचारावरून तीव्र जनभावना निर्माण झाली होती. त्यावेळी केंद्रात शरद पवार कृषिमंत्री होते. शरद पवार यांच्यावर एकाने हल्ला केला होता. त्यावेळी अण्णा हजारेंनी या हल्ल्याचे समर्थन करत 'मी गांधी नाही', असे म्हटले होते. अण्णांच्या या भूमिकेविषयी काहींनी नाराजी व्यक्त केली गेली. तेव्हापासून शरद पवार आणि राष्ट्रवादी, अण्णा हजारे यांच्या भूमिकेपासून अधिकच दूर गेले. राष्ट्रवादी फुटल्यानंतर मध्यंतरी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि अण्णा हजारे यांच्यात संघर्ष पेटला होता.

शरद पवार यांनी आता एका मुलाखतीत भ्रष्टाचारावर लढत असलेले अण्णा हजारे आहेत कुठे? असा सवाल केला आहे. 'माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी केला होता. चौकश्या झाल्या. आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?", असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

Anna Hazare-Sharad Pawar
Thane Lok Sabha 2024: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यावर चार हजार पोलिसांची नजर, पॅरामिलिट्री फोर्स,स्ट्रायकिंगच्या ३४ तुकड्या सज्ज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com