Municipal Corporation : खळबळजनक! छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रारूप यादीत चक्क ग्रामपंचायतीचे दीड हजार मतदार!

Local Body Elections 2025: महापालिकेच्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. मतदार याद्या प्रसिद्ध होताच त्यावर मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले. महापालिकेचे 29 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातील तीन ते साडेतीन हजार मतदार हे एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात टाकण्यात आल्याचे मतदारयाद्यांची तपासणी केल्यानंतर दिसून आले.
Municipal Corporation Voter List News Chhatrapati Sambhajinagar
Municipal Corporation Voter List News Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या चतु:सिमा निश्चित नसल्यामुळे हद्दीच्या बाहेरील मतदारांचाही महापालिकेत समावेश झाला आहे. रावरसपूरा ग्रामपंचायतीचे सुमारे दीड हजार मतदाराचा समावेश प्रभाग-४ पडेगाव-मिटमिट्याच्या यादीत नावे टाकण्यात आली. शिवसेनेचे उपशहरप्रमुख गणेश लोखंडे यांनी आक्षेप दाखल केला आहे. प्राधिकृत अधिकारी अपर्णा थेटे यांनी आक्षेपाची दखल घेत स्थळपाहणी केली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Municipal Election) 20 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. मतदार याद्या प्रसिद्ध होताच त्यावर मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले. महापालिकेचे 29 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातील तीन ते साडेतीन हजार मतदार हे एका प्रभागातून दुसर्‍या प्रभागात टाकण्यात आल्याचे मतदारयाद्यांची तपासणी केल्यानंतर दिसून आले.

मनपाने प्रारुप मतदारयाद्यांवर आक्षेप दाखल करण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. परंतु, मतदारयाद्यांचे विभाजन करताना प्रचंड चुका झाल्या आहेत. त्यामुळे आक्षेप नोंदविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

त्यामुळे आक्षेप नोंदविण्यात येत आहे. एकीकडे आक्षेप नोंदविले जात असून दुसरीकडे आक्षेपांचा निपटारा केला जात आहे. प्राधिकृत अधिकारी, प्रगणक हे मतदारांच्या घरोघरी जाऊन स्थळपाहणी करीत आहे. त्यातच आता महापालिकेच्या हद्दीबाहेरील मतदारांचा महापालिकेच्या मतदारयादीमध्ये समावेश झाल्याचा आक्षेप दाखल करण्यात आला आहे.

Municipal Corporation Voter List News Chhatrapati Sambhajinagar
High Court News : मोठी घडामोड! निवडणुकांच्या दोन्ही टप्प्यांचा निकाल एकाच दिवशी लावता येईल का? न्यायालयानं आयोगाला थेटच विचारलं

मनपाच्या पडेगाव जवळच रावरसपूरा ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीची हद्द मनपाला खेटूनच आहे. रावरसपूरा ग्रामपंचायतीमधील सुमारे दीड हजार मतदारांचा समावेश महापालिकेच्या मतदार यादीमध्ये झाला आहे. विशेष म्हणजे या मतदार यादीतील मतदारांसमोर दुबार नावे असल्याने दोन स्टार दाखविण्यात आले आहे.

मतदार यादीतील नावे महापालिकेच्या मतदार यादीत आल्याने निवडणूक विभाग गोंधळून गेला आहे. तहसील कार्यालयाकडून प्रमाणित करून मतदार यादी देण्यात आली असलीतरी रावरसपूरा ग्रामपंचायतीचे दीड हजार मतदार प्रभाग चारमध्ये टाकण्यात आले आहे.

Municipal Corporation Voter List News Chhatrapati Sambhajinagar
Hingoli Election: धक्कादायक! सांगोल्यानंतर आता हिंगोली; मतदानाला अवघे काही तास, पोलिस अन् निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी कारवाई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहरप्रमुख गणेश लोखंडे यांनी निवडणूक विभागाकडे आक्षेप नोंदवला असून या मतदारांना मतदानासाठी प्रतिबंध घालावा, अशी मागणी लोखंडे यांनी केली आहे.

मनपाच्या प्रभाग- 4 मधील मतदारयादीमध्ये रावरसपूरा ग्रामपंचायतीच्या मतदारांचा समावेश झाला आहे. या संदर्भातील आक्षेप प्राप्त झाला असून प्राधिकृत अधिकारी अपर्णा थेटे यांनी स्थळपाहणी करून प्रगणकांना मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याची सूचना केली आहे. तसेच दुबार मतदार असतील तर त्यांच्याकडून लेखी घेतले जाणार असल्याचे निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com