

Pune News: निवडणुकांमध्ये कोट्यावधींचा होणारा खर्च हा काही नवीन नाही. मग ती कोणतीही निवडणूक असली तरी अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत देखील कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. तरी देखील प्रत्येक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने खर्चाच्या मर्यादा आखून दिल्या आहेत.
महापालिका निवडणुकांसाठी देखील प्रत्येक उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी किती खर्च करता येऊ शकते याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. असं असलं तरी कागदोपत्री दिसणारा खर्च आणि प्रत्यक्षात होणार करतोय यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत जाणवते.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून चार सदस्यीय ४० आणि पाच सदस्यीय १, असे ४१ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या ४१ प्रभागांतून एकूण १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रभागामधील राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांसह लहान-लहान पक्ष व अपक्ष असे १ हजार १५३ उमेदवार निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत.
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 1 उमेदवारास आयोगाच्या परवानगीनुसार 15 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 1 हजार 153 उमेदवार असून, या सर्वांनी मिळून 172 कोटी 95 लाखांचा खर्च केली आहे. ही जरी रक्कम निवडणूक आयोगाच्या नियमानुसार असली तरी बेकायदेशीरपणे खर्च केलेली रक्कम यापेक्षा किती तरी पटीने जास्त असणार आहे.
निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून वारेमाप खर्च केला जातो. मतदारांना विविध प्रकारची आमिषे दाखवली जातात. एका उमेदवारांकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. याला लगाम लावण्यासाठी निवडणूक आयोगाने एका उमेदवाराने १५ लाखांपर्यंत खर्च करावा, खर्चाचा दैनंदिन हिशोब आयोगाला सादर करावा, तसेच अंतिम हिशोब एका महिन्याच्या आत सादर करावा, असे बंधन घातले आहे. निवडणूक आयोगाच्या या नियमानुसार पुण्यातील १ हजार १५३ उमेदवारांनी प्रत्येकी १५ लाखांप्रमाणे १७२ कोटी ९५ लाखांचा खर्च केला आहे. खर्चाचा हा आकडा नियमानुसार असला तरी प्रत्येक उमेदवाराचा बेहिशोबी खर्च मोठा असणार आहे हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.