Demolition Action : मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलच्या अतिक्रमणांकडे महापालिकेची वक्रदृष्टी; नोटीस बजावताच एमआयएम पुन्हा आक्रमक

Aimim Criticism On Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Civic Demolition Action : टीसीएस धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणात छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरात राबवण्यात येत असलेली अतिक्रमण हटाव कारवाई सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. टीसीएस धर्मांतरण आणि लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय देणारे एमआयएमचे नगरसेवक मतीन खान यांच्या घरावर महापालिकेने बुलडोझर चालवला. तेव्हाही एमआयएमने महापालिकेवर पक्षपातीपणाचा आरोप करत कारवाईचा निषेध केला होता.

शहरातील शहागंज भागात फळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई केली. तिथेही एमआयएमने कारवाईला विरोध करत पथकाला हुसकावून लावले होते. आता महापालिकेने मुस्लिम नुमाइंदा कौन्सीलच्या कार्यालयाला त्यांच्या चार अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावली आहे. संबंधित मालमत्तेची कागदपत्रे मागताच मुस्लिम नुमाइंदा कौन्सीलचे पदाधिकारी, एमआयएमचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर, शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी आयुक्तांची भेट घेत नोटीस रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.

शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर ते कोणाच्या सांगण्यावरून नोटीस बजावत आहेत? असा सवाल केला. कायदा धाब्यावर बसून महापालिकेतील अधिकारी काम करणार असतील तर मग आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल? अशी धमकीच सिद्दीकी यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी मोजक्या लोकांना नोटीस बजावल्या जात आहेत. अतिक्रमणावरील कारवाईला आमचा विरोध नाही, पण महापालिकेकडून ते हटवताना केला जाणारा भेदभाव, दुटप्पीपणा यावर आमचा आक्षेप आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar MLC: जालना-छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपने जिंकली; सुहास शिरसाठ विक्रमी मतांनी विजयी

महापालिकेतील काही अधिकारी विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. शहरातील प्रत्येक अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे, त्याआधी नियमानूसार त्यांना नोटीस बजावणे अपेक्षित असते. मात्र विशिष्ट समाजाला टार्गेट केले जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून स्पष्ट होते. हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही. महापालिका आयुक्तांना या संदर्भात आम्ही भटलो, मात्र त्यांना या नोटीसीबाबत काहीच माहित नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर माहिती घेऊन ते यावर योग्य ती कारवाई करणार आहेत.

कुठल्याही परिस्थितीत चुकीची आणि विशिष्ट समाजाला लक्ष्य करून कारवाईचा प्रयत्न महापालिकेकडून झाला तर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराही समीर साजेद बिल्डर यांनी दिला. दरम्यान, मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलचे पदाधिकारी यांनीही महापालिकेच्या नोटीसीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar : भाजप, शिवसेना, एमआयएमचे स्वीकृत नगरसेवकपद धोक्यात! निवडीला कोर्टात आव्हान!

कोणाचीही कुठलीही तक्रार नसताना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्या चार जणांना नोटीसी देण्यात आल्या आहेत, त्यांच्या नावावर स्वतःच्या मालकीची घरंच नाही, ते भाड्याने राहतात? मग या नोटीस कशा काढल्या? असा सवाल त्यांनी केला. 'हम बहोत नंगे लोग,रोडपर खडे राहकर नंगापण दिखाएंगे' अशी धमकीच या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com