Chhatrapati Sambhajinagar : भाजप, शिवसेना, एमआयएमचे स्वीकृत नगरसेवकपद धोक्यात! निवडीला कोर्टात आव्हान!

Nominated Councillors Court : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या पदावर टांगती तलवार आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या विरोधात कोर्टात धाव घेण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

BJP News : महापालिका निवडणुकीच्या काळात सर्वच पक्षांकडे उमेदवारीसाठी रांगा लागल्या होत्या. यात प्रामुख्याने भाजप, शिवसेना-एमआयएम पक्षात तर मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा भडका उडाला होता. या बंडखोरांना शांत करताना नेत्यांची दमछाक झाली होती. काही ताकदीच्या पदाधिकाऱ्यांना स्वीकृत पदाचे गाजर दाखवत माघार घेण्यास भाग पाडण्यात आले होते.

प्रत्यक्षात जेव्हा स्वीकृत सदस्य पदासाठी यादी देण्याची वेळ आली तेव्हा पाच-तीन-दोन जांगासाठी पाचशे ते दीड हजार इच्छुकांनी अर्ज केले होते. यातून निवड करताना सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर या तीन पक्षाचे अनुक्रमे पाच-तीन-दोन अशा दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करून त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हे प्रमाणपत्र वाटप होऊन काही दिवस उलटत नाही तोच भाजपाच्या माजी नगरसेविकेने या दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीला खंडपीठात आव्हान देणारी याचिका दाखल केली.

माजी नगरसेविका डॉ. आशा उत्तम बिनवडे यांनी निवडणूक याचिका (क्र. 20/2026) दाखल केली आहे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एन. एच. तिखे यांनी सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. बिनवडे यांनी याचिकेत 24 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अधिसूचनेद्वारे झालेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
BJP politics : भाजपकडे स्वीकृत नगरसेवकसाठी 147 अर्ज; सगळ्यांना मागे ठेवून माजी केंद्रीय मंत्र्याचा मुलाला संधी

ही प्रक्रिया राबवताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 तसेच पात्रता व नियुक्ती नियम 2012 मधील नियम 4 व 5 चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणात तत्कालीन मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि नगरसचिव भोंबे यांच्यासह 10 नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

न्यायालयाने संबंधित सर्वांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिल्यानंतर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपच्या 10 वर्षे नगरसेविका राहिलेल्या डॉ. आशा बिनवडे यांनी स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज केला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून त्या पक्षसंघटनेत सक्रिय नसल्याचे कारण देत त्यांच्या अर्जाचा विचार झाला नसल्याचे बोलले जाते. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचे निकष पाळले गेले नाहीत, असा आक्षेप घेत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Pune Politics : स्वीकृत नगरसेवक प्रकरणात भाजपमध्ये नाराजीची लाट; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेवर पाणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com