Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha: 'एक्झिट पोल' फोल, ना खैरे ना भुमरे, इम्तियाज जलील आघाडीवर...

Chandrakant Khaire imtiaz jaleel Sandipan Bhumare : पोस्टल मतांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतल्यामुळे पहिल्या फेरीतही ते आघाडीवर राहतील, असे वाटत होते.
Chandrakant Khaire, imtiaz jalel, Sandipan Bhumare
Chandrakant Khaire, imtiaz jaleel Sandipan Bhumare Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : 'एक्झिट पोल'मध्ये लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे विजयी होणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीच्या निकालात विद्यमान खासदार एमआयएमचे इम्तियाज जलील 3 हजार 338 मतांची आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर महायुतीचे संदीपान भुमरे, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोस्टल मतांमध्ये चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतल्यामुळे पहिल्या फेरीतही ते आघाडीवर राहतील, असे वाटत होते.

परंतु पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्यापासून इम्तियाज जलील हे प्रतिस्पर्धी खैरे-भुमरे यांच्या पेक्षा अधिक मते घेऊन आघाडीवर होते. पहिल्या फेरीचा अधिकृत निकाल जाहीर झाला तेव्हा इम्तियाज जलील यांना 19745, संदीपान भुमरे 16407 तर चंद्रकांत खैरे 11429 मते मिळाली.

Chandrakant Khaire, imtiaz jalel, Sandipan Bhumare
Omraje Nimbalkar : महाराष्ट्रातील पहिला निकाल ठाकरेंचा, धाराशिवमधून ओमराजे 'स्पेशल फ्लाइट'ने दिल्लीत?

गेल्या लोकसभा निवडणुकीत निकालाला कलाटणी देणारे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पहिल्या फेरीत फक्त 1676, तर स्वबळावर लढलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना केवळ 1871 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीच्या निकालाचा ट्रेंड पुढे कायम राहतो की हे आकडे बदलतात यावर संभाजीनगरचा खासदार कोण? हे ठरणार आहे.

पहिल्या फेरीत एकूण 55185 मतांची मोजणी झाली. यात 160 मतदारांनी नोटाला मतदान केल्याचे समोर आले आहे. इम्तियाज जलील यांना शहरी भागातून मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Chandrakant Khaire, imtiaz jalel, Sandipan Bhumare
Bajrang Sonwane : 'बाप्पा'ची कमाल, पहिल्याच फेरीत बजरंग सोनवणे आघाडीवर

मुस्लिम बहुल भागात एमआयएमला एकगठ्ठा मिळाली होती, तसेच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मुस्लिम मतांचा टक्काही वाढला. त्याचा परिणाम पहिल्या फेरीत इम्तियाज जलील यांना आघाडी मिळण्यात झाला आहे. ग्रामीण भागातील मतमोजणीवर संभाजीनगरचा निकाल अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com