Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Chandrakant Khaire, Sandipan Bhumresarkarnama

Khaire Vs Bhumre News : निवडणूक भुमरे-खैरेंची, पण टेन्शन मात्र विद्यमान अन् भावी आमदारांना!

Shivsena Vs Shivsena : या सगळ्यांवर आपापल्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती.

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक झाली, की साधरणतः सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका होणार आहे. महायुती-महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर त्या त्या विधानसभा मतदरासंघातील विद्यमान आमदार आणि भावी आमदारांना कामाला लावले होते.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शहरातील पुर्व-पश्चिम- मध्य, तर ग्रामीणचे कन्नड, वैजापूर-गंगापूर-खुलताबाद हे विधानसभा मतदारसंघ येतात. यात शहरातील पुर्व व ग्रामीणमधील गंगापूर मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर पश्चिम, मध्य आणि वैजापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. कन्नड या एकमेव विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उदयसिंह राजपूत आमदार आहेत.(Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Jalna Loksabha Constituency : जालन्यात काळे रिलॅक्स, तर दानवेंना टेन्शन?

या सगळ्यांवर आपापल्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तर थेट मताधिक्य मिळाले नाही, तर विधानसभेला उमेदवारी देतांना विचार केला जाईल, अशा इशाराच दिला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार टेन्शनमध्ये आले आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 63 टक्के एवढे मतदान झाले होते.

शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे(Atul Save), पश्चिमचे संजय शिरसाट, मध्यचे प्रदीप जैस्वाल यांचे प्रगतीपुस्तक लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निश्चितच तपासले जाणार आहे. शिरसाट आमदार असलेल्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेकडून इच्छूक असलेल्या रमेश गायकवाड यांनी खैरेंसाठी मेहनत घेतल्याचे सांगितले जाते. ग्रामीणमध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विकास कामासाठी भरमसाठ निधी देण्यात आला.

Chandrakant Khaire, Sandipan Bhumre
Chhatrapati Sambhajinagar News : कोणी म्हणत मशाल, तर कोणी बाण ? पतंगाची धास्ती कायम..

त्यामुळे सहाजिकच त्यांच्याकडून महायुतीच्या भुमरेंना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. तर याच मतदारसंघात महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांच्यासाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावली. खैरेंना मताधिक्य मिळाले, तर येणाऱ्या विधानसभेत चिकटगांवकर यांचे तिकीट कन्फर्म होणार आहे.

अशीच परिस्थिती गंगापूर विधानसभा मतदारसंघात कृष्णा पाटील डोणगावंकर यांची असणार आहे. इथे भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत बंब यांनी भुमरेंसाठी आपली सगळी यंत्रणा नियोजनबद्ध पणे वापरल्याची चर्चा आहे. तीन टर्मपासून बंब या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने आपल्या अनुभवाचा फायदा त्यांनी भुमरेंना लीड मिळवून देण्यासाठी केल्याचे बोलले जाते.

कन्नड विधानसभा मतदारसंघात पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. इथे त्यांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना रोखून खैरेंना मताधिक्य मिळवून देण्याचे मोठे आव्हान होते. यात ते यशस्वी झाले तर त्यांना ठाकरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारीचे रिटर्न गिफ्ट मिळू शकते. एकूण भुमरे-खैरेंच्या निवडणुकीत महायुती-महाविकास आघाडीच्या आमदारांसह इच्छूकांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com