Lok Sabha Election 2024 : आंबेडकरांशी तुटले, पण एमआयएमने दुसऱ्या भावाशी जुळवले...

AIMIM News : वंचितमुळे मतांमध्ये निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी MIM नव्या मित्राच्या शोधात आहे. त्यांचा शोध अद्याप संपलेला नसला तरी प्रकाश आंबेडकरांशी तुटले, पण एमआयएमने त्यांच्या दुसऱ्या भावाशी जुळवत काही प्रमाणात मतांची तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
MP Imtiaz Jalil, Anandraj Ambedkar
MP Imtiaz Jalil, Anandraj AmbedkarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचितची (MIM And VBA) आघाडी झाली होती. या आघाडीने राज्यात धुमाकूळ घातला होता, पण विधानसभेला ही युती तुटली. गेल्यावेळी या युतीचा राज्यात एकमेव खासदार छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आला होता. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सामना हा शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्याशी होणार आहे. (Anandraj Ambedkar And Imtiaz Jalil Meeting)

वंचितमुळे मतांमध्ये निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी एमआयएम (MIM) नव्या मित्राच्या शोधात आहे. त्याचा शोध अद्याप संपलेला नसला तरी प्रकाश आंबेडकरांशी (Prakash Ambedkar) तुटले, पण एमआयएमने त्यांच्या दुसऱ्या भावाशी जुळवत काही प्रमाणात मतांची तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) हे दोघेही निवडणूक लढवत आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून (Akola) तर आनंदराज हे अमरावती लोकसभा मतदासंघातून मैदानात उतरले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांची संभाजीनगरातील त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. स्नेहभोजन करताना या दोन नेत्यांमध्ये राजकीय विषयावर चर्चाही झाली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय आनंदराज आंबेडकर यांनी घेतल्याबद्दल इम्तियाज जलील यांनी आनंद व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांना अमरावतीत येऊन निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते. यावर इम्तियाज यांनी ओवेसींनी सांगितले तर तिथे येऊनही लढेन, असे प्रतिआव्हान दिले होते. याच पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर आणि इम्तियाज जलील यांची झालेली भेट महत्त्वाची समजली जात आहे.

MP Imtiaz Jalil, Anandraj Ambedkar
Chhatrapati Sambhajinagar News : ठाकरे गटातील नाराजी नाट्य थांबेना, दानवे-खैरेंचे सूर जुळले असतानाच आता...

एमआयएमने अमरावतीमध्ये राणा पती-पत्नीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीत पाठिंबा देऊन संभाजीनगरात त्यांची काही मदत होते का? असा प्रयत्न इम्तियाज जलील यांनी या डिनर डिप्लोमसीतून केल्याचे बोलले जाते. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितमुळे 2019 मध्ये इम्तियाज जलील यांचा विजय सोपा झाला होता.

MP Imtiaz Jalil, Anandraj Ambedkar
Pankaja Munde News : 'भाऊ विसरेल पण बहीण भावाला विसरत नाही' ; अजित पवारांच्या समक्ष पंकजा मुंडेंचं विधान!

आता आंबेडकर सोबत नसल्यामुळे एमआयएमला नव्या मित्राची गरज होती. ती आनंदराज आंबेडकरांकडून पूर्ण झाल्याची चर्चा होत आहे. आनंदराज आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे अमरावतीत एमआयएमकडून आनंदराज यांना मदत आणि त्याबदल्यात त्यांची संभाजीनगरात साथ, असा फॉर्म्युला इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनात ठरल्याचे बोलले जात आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com