Chhatrapati Sambhajinagar News : ठाकरे गटातील नाराजी नाट्य थांबेना, दानवे-खैरेंचे सूर जुळले असतानाच आता...

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत ठाकरे गटातील कोण कोण नेते, पदाधिकारी नाराज होतात? हे पाहावे लागणार आहे.
ambadas danve chandrakant khaire
ambadas danve chandrakant khairesarkarnama

शिवसेना ठाकरे गटातील जिल्ह्यातील नेत्यांचे नाराजी नाट्य काही केल्या संपत नाही. लोकसभेच्या उमेदवारीवरून ( Lok Sabha Election 2024 ) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात वाद होता. रविवारी ( 31 मार्च ) दानवे यांनी खैरेंच्या घरी जाऊन त्यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल शुभेच्छा देत व पेढा भरवत त्यावर पडदा टाकला.

सोमवारी ( 1 एप्रिल ) दानवे-खैरे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीची संयुक्त बैठक घेऊन कामाला लागले असतानाच आता आणखी एका पदाधिकाऱ्याची नाराजी समोर आली आहे. ते म्हणजे माजी आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवणी. पण, त्यांच्या नाराजीचे कारण दुसरेच आहे. ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी राजू वैद्य यांची निवड केल्यामुळे तनवाणी नाराज झाले आहेत. आता तनवाणी यांची नाराजी दूर करण्यासाठी खैरेंना ( Chandrakant Khaire ) धावपळ करावी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीचे मतदान होईपर्यंत ठाकरे गटातील कोण कोण नेते, पदाधिकारी नाराज होतात? हे पाहावे लागणार आहे. शिवसेनेनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यात महानगरप्रमुखपदी राजू वैद्य यांची नियुक्ती केल्यामुळे किशनचंद तनवाणी नाराज झाले आहेत. सोमवारी महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला त्यांनी दांडी मारत आपली नाराजी दाखवून दिली.

ambadas danve chandrakant khaire
Danve Meet Khaire : अंबादास दानवेंनी खैरेंची गळाभेट घेत पेढा भरवला अन् संशयाचे धुके दूर केले...

तनवाणी यांची शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी सोबत जवळीक वाढल्याचे बोलले जाते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील पाच आमदारांनी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचे नेतृत्व नाकारले. मात्र, पदाधिकारी ठाकरेंसोबत आहेत. महानगरप्रमुख पदावर राजू वैद्य यांची निवड करताना तनवाणी यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप केला जातोय.

दानवे ( Ambadas Danve ) यांच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण, तिकडे तनवाणी फिरकलेच नाही. त्यांच्या अनुपस्थितीमागे महानगप्रमुख पदावरील नेमणूक हेच कारण असल्याचे सांगितले जाते. किशनचंद तनवाणी बैठकीला हजर का नाहीत? अशी विचारणा केली तेव्हा तनवाणी आजारी आहेत, डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्ट सांगितली असल्याचे खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी सांगितले. दरम्यान, तनवाणी हे दुपारपर्यंत त्यांच्या कार्यालयात बसून होते, अशी माहिती आहे.

एवढेच नाही तर नाराज तनवाणी यांची शिंदे गटाच्या शहरातील लोकप्रतिनिधी सोबत जवळीक वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. तनवाणी हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांत भेट घेणार असल्याचीही चर्चा आहे.

नव्याने जाहीर झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक वर्षे पक्ष संघटनेचे काम करणाऱ्यांना संधी देण्यात आलेली नाही, तर नव्यांना पदे देण्यात आली आहेत, असा आरोप होत आहे. माजी महापौर सुदाम सोनवणे, माजी सभागृहनेता गिरजाराम हाळनोर यांना पदे मिळतील, अशी अपेक्षा होती. पण डॉ. शोहेब हाश्‍मी, सचिन तायडे यांना संघटक पद देण्यात आले आहे.

नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मुंबईतून झाल्या आहेत. या नियुक्त्या करताना माझ्याकडे कुठलीही विचारणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या नियुक्त्या सर्वांसोबत चर्चा करून करणे अपेक्षित होते. त्यामुळे जुने पदाधिकारी नाराज झाले असल्याची प्रतिक्रिया तनवाणी यांनी या सगळ्या वादावर दिली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

ambadas danve chandrakant khaire
Lok Sabha Election: अंबादास दानवेंशी थेट संपर्क झाला नाही पण..., रावसाहेब दानवेंचं सूचक वक्तव्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com