Latest News on Maharashtra Politics
Latest News on Maharashtra Politics Sarkarnama

Marathwada UBT News : मतदारसंघ सांभाळून खैरे-जाधव- ओमराजेंना करावा लागणार पक्षाचा प्रचार...

Loksabha Election updates : मराठवाड्यातील संभाजीनगर, परभणी, धाराशिव या तीन मतदारसंघांचे उमेदवार अनुक्रमे चंद्रकांत खैरे, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
Published on

Latest News on Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने सतरा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज चाळीस स्टार प्रचारकही घोषित केले. यात लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेल्या अनेक नेत्यांचीही नावे आहेत. मराठवाड्यातील संभाजीनगर, परभणी, धाराशिव या तीन मतदारसंघांचे उमेदवार अनुक्रमे चंद्रकांत खैरे, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

पैकी ओमराजे, जाधव यांची एक भाषा शैली आणि आक्रमकपणा पाहता ते प्रचारात रंगत आणू शकतात. चंद्रकांत खैरे यांची मात्र अशी काही विशेष भाषण शैली नसली तरी त्यांच्या पक्षातील अनुभव, ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचेही नाव स्टार प्रचारकांमध्ये समाविष्ट करण्यात आले असावे. विशेष म्हणजे या तिघांनाही आपापला मतदारसंघ सांभाळून स्टार प्रचारकाची अतिरिक्त भूमिका वठवावी लागणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी गेल्या दोन अडीच वर्षांत ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना सभागृहात आणि सभागृहाबाहेरही सळो की पळो करून सोडले, त्या दानवेंवर उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. एकीकडे त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र दानवे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्यावर राज्यभरातील प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.

Latest News on Maharashtra Politics
Lok Sabha Election News : महाविकास आघाडीतील वाद विकोपाला? काँग्रेस भाजपला नव्हे ठाकरेंना देणार धक्का?

इकडे संभाजीनगरात सहाव्यांदा लढणारे चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांना एमआयएम, महायुती आणि अपक्ष उमेदवाराशी लढा देत ही जागा शिवसेनेकडे खेचून आणायची आहे. त्यामुळे स्टार प्रचारक म्हणून त्यांच्या वाटेला किती सभा, दौरे येतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. परभणीत संजय जाधव (Sanjay Jadhav) हे तिसऱ्यांदा उमेदवार आहेत. तिथेही संभाजीनगरसारखीच परिस्थिती असून, जाधव यांना हॅटट्रिकसाठी जोर लावावा लागणार आहे.

ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांची धाराशिव लोकसभा मतदारसंघात (Dharashiv Loksabha Constituency) नेहमी उपलब्ध असणारा खासदार अशी प्रतिमा आहे. शिवाय लोकांच्या मनाला हात घालणाऱ्या त्यांच्या भाषणशैलीसाठी ते ओळखले जातात. धाराशिवमध्ये सर्वप्रथम ओमराजे यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. सलग दुसऱ्या विजयासाठी त्यांना पालकमंत्री तानाजी सावंत, भाजपचे आमदार तथा पारंपरिक विरोधक राणाजगजितसिंह पाटील (RanaRanjitsingh Patil) अशा प्रस्थापितांविरोधात लढावे लागणार आहे. यातच त्यांच्यावर स्टार प्रचारक म्हणून पक्षाने जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे खैरे-जाधव-ओमराजे यांना आपले मतदारसंघ सांभाळून पक्षाच्या इतर सहकाऱ्यांसाठी फिरण्याची कसरत करावी लागणार आहे.

Edited BY : Rashmi Mane

R

Latest News on Maharashtra Politics
Dharashiv Loksabha News : धाराशिवमध्ये मोठा ट्वि्स्ट; ठाकरेंच्या ओमराजेंविरोधात अजित पवार 'हा' हुकमी एक्का काढणार
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com