Eknath Shinde: एवढ्या 'फास्ट' रंग बदलणारा सरडा...; मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर सडकून टीका

Eknath Shinde On Uddhav Thackeray: संभाजीनगरमधील भरसभेत मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरून उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवली. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत असताना ते मोदींचं तोंडभरून कौतुक कसे करत होते हे दाखवण्याचा शिंदेंनी प्रयत्न केला.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांकडून आपल्या विरोधी पक्षावर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर टोकाचे आरोप केले जात आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणि चिघळला आहे. सरडे रंग बदलतात, मात्र एवढ्या 'फास्ट' रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बोचरी टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. या वेळी शक्तिप्रदर्शन करीत शिंदे सेनेने मोठी रॅली काढत भुमरेंचा उमेदवारी अर्ज भरला. यानंतर शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी परिसरात जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भरसभेत मुख्यमंत्र्यांनी मोबाईलवरून उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) जुनी व्हिडिओ क्लिप दाखवली. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत असताना ते मोदींचं तोंडभरून कौतुक कसे करत होते हे दाखवण्याचा शिंदेंनी (Eknath Shinde) प्रयत्न केला. व्हिडिओ दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करणारे ठाकरे आता त्यांच्यावर टीका करताहेत.

सरडे रंग बदलतात, मात्र एवढ्या 'फास्ट' रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला असं शिंदे या वेळी म्हणाले. तसेच मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना पोटशूळ उठला आहे. भुमरेंचा फॉर्म भरायला एवढ्या संख्येने तुम्ही आलात, त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे, असा विश्वासदेखील त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivsena News : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादिवशीच संभाजीनगरमध्ये धक्का; शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा 'जय महाराष्ट्र'

काँग्रेसने माफीनामा काढायला पाहिजे

मुख्यमंत्र्यांनी या वेळी काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला. देशातील गरिबांना रोटी, कपडा, मकान देणारे मोदी आपले पंतप्रधान आहेत. भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाही. ते निष्कलंक आहेत. मागील 60 वर्षांपासून गरिबांचे शोषण करणारा काँग्रेस पक्ष वचननामा काढत आहे. परंतु वचननामा काढायचा नैतिक अधिकार नाही, तर त्यांनी माफीनामा काढायला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : उन्हाने तापलात, आता मनाने तापा अन् भुमरेंना माझ्यासोबत संसदेत पाठवा...

नो खैरे ओन्ली भुमरे... एकच मामा भुमरे मामा

शिंदे यांनी या वेळी ठाकरे पिता-पुत्रांवर निशाणा साधला तसेच ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंवर टीका केली. ते म्हणाले, 'नो खैरे ओन्ली भुमरे... एकच मामा भुमरे मामा,' ऐरेगैरे यांच्यावर बोलणार नाही. जालन्यातून रावसाहेब दानवे आणि संभाजीनगरातून भुमरे लोकसभेत निवडून गेले पाहिजेत असं ते म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com