Lok Sabha Election 2024 : उन्हाने तापलात, आता मनाने तापा अन् भुमरेंना माझ्यासोबत संसदेत पाठवा...

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे यांनी अगदी मोजक्या शब्दांत पण कार्यकर्त्यांना चार्ज करणारे भाषण केले. उन्हाने कार्यकर्ते चांगलेच तापले याची जाणीव असलेल्या दानवे यांनी याचाही खुबीने वापर करत त्यांना निवडणुकीचे मतदान होईपर्यंत मनाने तापा आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन केले.
Sandipan Bhumre-Raosaheb Danve
Sandipan Bhumre-Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 25 April : ऊन खूप तापलं आहे, तुम्ही चार तासांपासून उन्हात आहात, आम्ही सावलीत आहोत. पण, उन्हाने तापलात तसे मनाने तापा आणि 13 मेपर्यंत शांत बसू नका, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. नरेंद्र मोदी यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, तेव्हा माझ्यासोबत भुमरे यांनाही संसदेत पाठवा, असे आवाहन दानवे यांनी केले.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे (Chhatrapati Sambhajinagar Loksabha Constituency) महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी क्रांती चौक ते गुलमंडीपर्यंत रॅली काढण्यात आली. महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासप यांच्यासह सगळे घटक पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते आपापल्या पक्षांचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक लोक या रॅलीत सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sandipan Bhumre-Raosaheb Danve
Sambhajinagar Lok Sabha 2024 : दोन तास उरले, वंचितचे अजून ठरेना; एमआयएमला संभाजीनगरात छुपा पाठिंबा?

यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve), गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रशांत बंब, रमेश बोरणारे यांच्यासह महायुतीचे आमदार, नेते, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

रॅलीनंतर गुलमंडी येथे झालेल्या सभेत अवघ्या पाच मिनिटांच्या भाषणात रावसाहेब दानवे यांनी तापलेल्या उन्हातही महायुतीच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम केले. मराठवाड्यात पारा चाळीस अंशांच्या पुढे आहे. यातच लोकसभा निवडणुकीचा प्रचार, सभा, बैठका आणि अर्ज दाखल करण्यासाठीच्या रॅलीत नेत्यांसह सामान्य कार्यकर्त्यांचाही घाम निघत आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातून बुधवारी (ता. 24 एप्रिल) रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर रॅलीत सहभागी होताना त्यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, त्यावर भला मोठा रुमाल, डोळ्यावर काळा चष्मा असा तगडा बंदोबस्त केला होता. अशा वेशभूषेत आज संदीपान भुमरे यांच्या रॅलीत दानवे सहभागी झाले होते.

Sandipan Bhumre-Raosaheb Danve
Solapur Politics : फडणवीसांनी मला एक महिना भेट दिली नाही; निष्ठावंत क्षीरसागरांच्या अश्रूंचा बांध फुटला

अकरा ते दुपारी दोनपर्यंत चाललेल्या रॅलीत कडक उन्हामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते घामाघूम झाले होते. त्यामुळे रॅलीचा समारोप करताना नेत्यांनी आटोपशीर भाषणं केली. रावसाहेब दानवे यांनी अगदी मोजक्या शब्दांत पण कार्यकर्त्यांना चार्ज करणारे भाषण केले. उन्हाने कार्यकर्ते चांगलेच तापले याची जाणीव असलेल्या दानवे यांनी याचाही खुबीने वापर करत त्यांना निवडणुकीचे मतदान होईपर्यंत मनाने तापा आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन केले.

Edited By : Vijay Dudhale

R

Sandipan Bhumre-Raosaheb Danve
ShahajiBapu Vs Jankar : फडणवीसांना भेटूनही उत्तम जानकर शरद पवारांकडे का गेले?; शहाजीबापूंची मार्मिक टिप्पणी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com