Nitin Gadkari News : पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत नितीन गडकरींची मोठी घोषणा; म्हणाले...

Political News : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. आगामी काळात इथेनॉलचे पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Beed News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. टीका करण्याची एकही संधी सॊडली जात नसल्याने रान पेटले आहे. भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर टीका केली .

दिवंगत गोपीनाथराव मुंडे, दिवंगत प्रमोद महाजन यांच्यामुळेच महाराष्ट्रात भाजपचा (Bjp) विस्तार झाला. जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न निश्चितच पूर्ण करणार अशी गॅरंटी मी देतो. पक्षात देखील संघर्ष करण्याची क्षमता असणाऱ्या व धमक असणाऱ्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankja Munde) यांना साथ देण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. (Nitin Gadkari News)

Nitin Gadkari
Ajit Pawar News : 'ही बनवाबनवी आणि नौटंकी चालणार नाही', ठाकरेंच्या शिलेदारांवर अजितदादा कडाडले !

देशातील शेतकरी ऊर्जा दाता व इंधन दाता बनणार असून भारत देश आता इंधन आयात करणारा देश न राहता इंधन निर्यात करणारा देश ठरेल. देशामध्ये गहू, मका, तांदूळ, साखर यांचे अतिरिक्त उत्पादन होत होते. इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळणार आहे. आगामी काळात इथेनॉलचे पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी माजलगाव येथील मोंढा मैदानावर नितीन गडकरी यांची सभा झाली. यावेळी उमेदवार पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, माजी मंत्री बबनराव लोणीकर, रमेश आडसकर, मोहन जगताप, बाबुराव पोटभरे यांची उपस्थिती होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संविधान कोणतीही संसद बदलू शकत नाही

काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे साठ वर्षांत जी विकासाची कामे झाली नाही त्या पेक्षा अधिक प्रमाणात कामे १० वर्षात झाली. विकासात कृषी उद्योग, व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती केली असून देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संविधान कोणतीही संसद बदलू शकत नाही. आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका आहे.

(Edited By : Sachin Wghmare)

Nitin Gadkari
Nitin Gadkari : एकदा निवडुन द्या पाच वर्ष 'करंट' लागेल !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com