Aurangabad Lok Sabha Exit Poll 2024 : 'एैरे गैरे' नाही, फक्त 'खैरे' ? ठाकरेंची शिवसेना कमबॅकच्या तयारीत !

Lok Sabha election 2024 exit poll Chandrakat Khaire V/s Sandipan Bhumre Imtiaz Jalil Fight :ठाकरेंच्या नऊ जागांमध्ये संभाजीनगरची जागा शिवसेनेने जिंकली तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा बुस्टर डोस ठरणार आहे. याचा परिणाम सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पहायला मिळेल.
Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant KhaireSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Exit Poll : लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रातील एक्झीट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहे.भाजपचे 'मिशन 45' अन् शिंदेंच्या शिवसेनेचे मिशन 48 रोखण्यात महाविकास आघाडी यशस्वी होताना दिसत आहे. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला राज्यात 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामध्ये लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा समावेश होतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाच वर्षापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ही जागा अवघ्या साडेचार हजार मतांनी गमावली होती. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांनाच या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली होती. महायुतीचे संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध खैरेंची थेट फाईट झाली. विरोधकांनी 'एैरे गैरै नथ्थू खैरे' नाही, फक्त भुमरे असा प्रचार केला होता. एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीतही खैरेंच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्या विजयाची शक्यता नसल्याचे दावे केले गेले.

शिवसेना ठाकरे गटाने राज्यात 21 मतदारसंघात उमेदवार दिले होते. दोन वर्षापुर्वी पक्षात झालेल्या फुटीचा फटका बसत असला तरी महाविकास आघाडीत ठाकरेंचाच वरचष्मा राहणार असे दिसते. ठाकरे गटाला अंदाज वर्तवण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगरचा समावेश असणार का? याची उत्सूकता सगळ्यांना लागली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांनी (Sharad Pawar) संभाजीनगरात सभा घेतल्या होत्या.

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
C-voter Survey 2024 Result : ठाकरेंची मशाल धगधगणार; डझनभर खासदार दिल्लीत जाणार

महायुतीच्या भुमरेंचा पराभव करून खैरे विजयी झाले तर इथे शिवसेनेचे कमबॅक होईल. निवडणुक प्रचारात एकनिष्ठ विरुद्ध गद्दार हा मुद्दा प्रमुख बनला होता. ठाकरेंच्या नऊ जागांमध्ये संभाजीनगरची जागा शिवसेनेने जिंकली तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा बुस्टर डोस ठरणार आहे. याचा परिणाम सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात पहायला मिळेल.

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Mahayuti Vs MVA: देवेंद्र फडणवीस डोकं खाजवणार ? मिशन 45 फसणार

पक्ष फुटल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठी सहानूभुती असल्याचे दिसून आले होते. चंद्रकांत खैरे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत भावनिक प्रचार केला होता. या सगळ्याचा परिणाम खैरेंच्या विजयात झाला तर मराठवाड्याच्या राजधानीत पुन्हा एकदा शिवसेनेची भगवी मशाल पेटू शकते. असे झाले तर विधानसभा निवडणुकीत पक्षाची आणखी होणारी पडझड थांबेल आणि जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट एक प्रबळ विरोधक म्हणून महायुतीच्या समोर उभा राहिल, अशी शक्यता आहे.

Imtiyaaz Jaleel, Sandeepan Bhumre, Chandrakant Khaire
Exit Polls 2024 : शिंदे, फडणवीस अन् अजितदादांना धक्का; ठाकरे, पवार, पटोले ठरणार 'किंग'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com